Dhirajlal Shah Passed Away: बॉलिवूडचे प्रसिध्द चित्रपट निर्माते धीरजलाल शाह यांच सोमवारी निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. धीरजलाल शाह यांचा भाऊ हसमुख यांनी त्यांच्या मृत्यूच्या माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, धीरजलाल यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना कोराना झाला होता. कोरोनामुळे मृत्यू झाला असी माहिती पुढे दिली. धीरजलाल यांच्या निधनानंतर बॉलिवूड चित्रपट सुष्टीत शोककळा पसरली आहे. हेही वाचा- 'आज तक' वृत्तवाहिनीचे प्रतिनीधी पंकज खेळकर यांचे निधन
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून धीरजलाल यांची प्रकृती ठिक नव्हती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाला. हळूहळू त्यांची प्रकृती २० दिवसांतच बिघडली. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांत शरिरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला.
निर्माते धीरलाल यांनी ९०च्या दशकांत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपटांत दिले. 'द हिरो', विजयपत, अक्षय कुमाराचा सुपरहिट चित्रपट 'खिलाडी' यासारख्या चित्रपटांच्या निर्मीतीची धूरा संभाळली. धीरलाल यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोककळा व्यक्त केली आहे. 12 मार्च मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनानंतर फिल्म इंड्रस्टीत शोककळा पसरली आहे.