Lock Down In India: लॉकडाऊन दरम्यान बॉलिवुड अभिनेत्री यामी गौतम ने बनवला घरगुती स्क्रब; पहा फोटो
यामी गौतम (Photo Credits: Instagram)

Lock Down In India: सध्या देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक दिग्गज तसेच कलाकारांकडून घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच बॉलिवुड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून स्किनची काळजी घेण्यासाठी काही घरगुती टिप्स दिल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे सध्या देशभरात सर्व पार्लर बंद आहेत. त्यामुळे या प्रदिर्घ काळात आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची यासंदर्भात यामी गौतमीने काही टिप्स सांगितल्या आहेत. यामीने घरातील साहित्याचा उपयोग करून घरगुती स्क्रब (Home Made Scrub) बनवला आहे. यामीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या घरगुती स्क्रबचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने घरात स्क्रब बनवलं आहे, असं म्हणत #staysafe #StayHome हे हँशटॅग वापरले आहेत. (हेही वाचा - महेश मांजरेकर यांच्या फॅमिली फोटोवर नेटीझन्सकडून घाणेरडी कमेंन्ट; ‘तुझे ढूंढ निकालूंगा तू जहां भी होगा’ म्हणत मांजरेकरांनी दिली धमकी)

 

View this post on Instagram

 

Made some homemade scrubs 🍃 #stayhome #staysafe 🙏🏻

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

 

View this post on Instagram

 

The taste of self-baked gluten-free bread 🍞🤎 #nofilter #stayhome #staysafe

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

दरम्यान, सध्या यामी वेळेचा सद्उपयोग करत स्वयंपाक बनवायलाही शिकत आहे. यामीने ग्लुटिन फ्री ब्रेड बनवला आहे. यामी सध्या क्वारंटाईन वेळेत आपल्यातील वेगवेगळ्या कला जोपासत आहे. यामी आता आगामी चित्रपट 'गिन्नी वेड्स सन्नी' (Ginny Weds Sunny) मध्ये आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.