सलमान खानची अभिनेत्री 40 व्या वर्षी पुन्हा आई ; तिसऱ्या मुलाचा जन्म
रंभा (Photo Credit : Instagram)

बंधन, जुडवा यांसारख्या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेली हिरोईन रंभा हिला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. 23 सप्टेंबरला तिने गोंडस मुलाला जन्म दिला. रंभाच्या पतीने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही गुड न्यूज शेअर केली. यात त्यांनी बाळ आणि आई दोघेही सुखरुप असल्याचे सांगितले आहे.

रंभा 2010 मध्ये बिजनेसमॅन इंद्रकुमारसोबत विवाहबद्ध झाली आणि तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.  रंभाचा पती मॅजिकवुड्स या कंपनीचा चेअरमन आणि सीईओ आहे. लग्नानंतर रंभा तिच्या कुटुंबासोबत टोरन्टोमध्ये स्थायिक झाली. संसारात रमलेल्या रंभाला दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या 7 वर्षांची असून साशा 3 वर्षांची आहे. या '६' अभिनेत्रींनी लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला !

काही दिवसांपूर्वीच तिच्या डोहाळे जेवणाचे फोटोज समोर आले होते. सिनेसृष्टीपासून दूर असली तरी रंभा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. कुटुंबासोबतचे फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

2016 मध्ये रंभा आणि तिच्या पतीमध्ये काही वाद निर्माण झाले होते. पण त्यांनी प्रयत्नपूर्वक नाते सुधारण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकत्र झाले.