रेखा (Photo Credits : Facebook)

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या घराच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण (Coronavirus) झाल्यामुळे त्यांचे घर व शेजारील परिसर कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आला होता. आता मात्र बीएमसीने (BMC) हा भाग कंटेनमेंट झोन मुक्त केला आहे, त्यानुसार रेखा यांच्या घराबाहेर लावलेले पोस्टर सुद्धा हटवण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकाला कोरोना होताच रेखा यांना सुद्धा स्वतःच्याच घरात क्वारंटाईन मध्ये राहण्यास सांगितले होते. नियमाप्रमाणे त्यांची सुद्धा कोरोना चाचणी होणे अपेक्षित होते मात्र रेखा यांनी या चाचणीसाठी नकार दिला. इतकेच नव्हे तर जेव्हा बीएमसी चे कर्मचारी रेखा यांच्या घराचे सॅनिटायजेशन करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना सुद्धा आत येऊ दिले नाही परिणामी केवळ बाहेरच सॅनिटायझरची फवारणी करून हे कर्मचारी परतले होते. (हेही वाचा: सारा अली खान हिच्या ड्रायव्हरला कोरोना व्हायरसची लागण; सारा सह कुटुंबियांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह)

रेखा यांना खबरदारी म्हणून बीएमसी कडून अनेकदा कोरोना चाचणी बाबत सूचना करण्यात आली होती. मात्र त्यांची मॅनेजर फरजाना यांच्या तर्फे रेखा यांनी वारंवार चाचणी करून देण्यास नकारच कळवला होता. आपण कोणाच्याही संपर्कात आलेलो नाही त्यामुळे चाचणी करण्याची आवश्यकता नाही असे त्यांची म्हणणे होते.

ANI ट्विट

दुसरीकडे बॉलिवूड चे महानायक अमिताभ बच्चन त्यांचा पुत्र अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर जुहू येथील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बच्चन कुटुंबीय सध्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरान्कडून सांगण्यात आले आहे.