काळवीट शिकार प्रकरण: सुनावणीला उपस्थित न राहिल्यास जामीन रद्द करण्याचे जोधपूर कोर्टाचे सलमान खान विरोधात फर्मान
Salman Khan (Photo Credits: Instagram)

काळवीट शिकार प्रकरणी (Black Buck Poaching Case) अभिनेता सलमान खान (Salman Khan) विरोधात आज जोधपूर कोर्टाने (Jodhpur Court) एक फर्मान जारी केलं आहे. पुढच्या सुनावणीसाठी सलमान खान कोर्टात हजर न राहिल्यास त्याचा जामीन रद्द करण्यात येईल, असे जोधपूर कोर्टाने सांगितले.

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान याला जोधपूर कोर्टाने 5 एप्रिल 2018 रोजी 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोर्टाच्या या निर्णयानंतर सलमानच्या वकीलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर 7 एप्रिल रोजी सलमान खान याला 25 हजार रुपये दंड भरल्यानंतर जामीन मंजूर झाला होता. (काळवीट शिकार प्रकरण: शस्त्र बाळगल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी सलमान खान याला जोधपूर कोर्टाकडून दिलासा)

ANI ट्विट:

बिश्नोई समाजाने सलमान खान विरोधातील ही केस अधिक तीव्र करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र जामीनावर सुटलेला सलमान कोर्टाच्या सुनावणी दरम्यान अनेकदा गैरहजर राहत असल्याने जोधपूर कोर्टाने त्याच्याविरोधात सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्यास जामीन नाकारण्याचा निर्वाळा दिला आहे.

'हम साथ साथ है' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान जोधपूर येथे काळवीटची शिकार आणि शस्त्र बाळगल्याने सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू आणि नीलम या कलाकारांची नावेही गुंतली होती. मात्र कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.