Jitendra Shastri Passed Away: चित्रपटसृष्टीतून पुन्हा एकदा एक वाईट बातमी समोर येत आहे. 'ब्लॅक फ्रायडे'पासून 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवणारे अभिनेते जितेंद्र शास्त्री (Jitendra Shastri) यांचे निधन झाले आहे. इंडस्ट्रीत त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली होती. हिंदी थिएटर सर्किटमध्ये जितेंद्र हे जीतू भाई या नावाने प्रसिद्ध आहेत. जितेंद्रने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या. परंतु, प्रेक्षकांना त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका भावली. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. ही बातमी समोर येताच चाहते आणि स्टार्स सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
जितेंद्र शास्त्री हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून उत्तीर्ण झाले होते. हा अभिनेता नाट्यविश्वात खूप प्रसिद्ध होता. जितेंद्र शास्त्रीने आपल्या कारकिर्दीत 'कायद-ए-हयात' आणि 'सुंदरी' सारख्या अनेक उत्तमोत्तम नाटकांमध्ये काम केले होते. याशिवाय त्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याने 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड', 'ब्लॅक फ्रायडे', 'दौर', 'लज्जा', 'चरस' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमध्ये छोटी भूमिका असूनही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि अनोख्या शैलीने छाप सोडली. (हेही वाचा - Tiger 3: सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत टायगर 3 चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, जाणून घ्या नवी तारीख
सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA) जितेंद्र शास्त्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. CINTAA ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर जितेंद्रच्या छायाचित्रासह लिहिले, 'आम्हाला नेहमी जितेंद्र शास्त्रींची आठवण येईल.'
CINTAA expresses its condolences on the demise of Jitendra Shastri pic.twitter.com/v9EwNBBR9A
— CINTAA_Official (@CintaaOfficial) October 15, 2022
संजय मिश्रा यांनी लिहिली भावनिक पोस्ट -
जितेंद्र यांचे खास मित्र आणि प्रसिद्ध अभिनेते संजय मिश्रा यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. संजयने जितेंद्रसोबतचा स्वतःचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओसोबत संजयने लिहिले की, 'जितू भाई तुम्ही असता तर तुम्ही म्हटला असता, मिश्रा कधी कधी असे होते की नाव मोबाइलमध्ये राहते आणि व्यक्ती नेटवर्कबाहेर जाते. पण तूम्ही आता या जगात नाहीस, पण तुम्ही नेहमी माझ्या हृदयाच्या आणि मनाच्या नेटवर्कमध्ये राहाल. ओम शांती.'
View this post on Instagram
संजय व्यतिरिक्त 'गंगाजल' आणि 'लगान' सारख्या चित्रपटांचे अभिनेता यशपाल शर्मा यांनीही सोशल मीडियावर जितेंद्र शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.