‘बाला’ चित्रपटाने पार केला 100 कोटींचा टप्पा
Bala | (Picture Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushman khurana) याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'बाला' चित्रपटाने (Bala Movie) बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने 100 कोटी 15 लाख रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीमध्ये येणाऱ्या दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचही सांगण्यात येत आहे.

या चित्रपटात आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकर, यामी गौतम यांच्यासह सौरभ शुक्ला, सीमा पहावा, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी, या नव्या-जुन्या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली आहे. यावर्षी 100 कोटीच्या क्लबमध्ये सामील झालेला 'बाला' हा 15 वा चित्रपट आहे. (हेही वाचा - Ragini MMS Returns सीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी)

तरण आदर्श ट्विट - 

आयुष्मान खुराणा नेहमी वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या धाटणीचे, खासकरून समाजात कमी प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या, समाजमनाकडून दुर्लक्षित झालेल्या घटकांवर आधारित चित्रपट करत असतो. बाला चित्रपटही याच स्वरुपातील एक चित्रपट आहे. बाला चित्रपटात त्याने अकाली आलेल्या टकलेपणाचा एखाद्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवले आहे. त्यानंतर तो या समस्येवर कोणते उपाय करतो, ही या चित्रपटाची कथा आहे.