बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक S. S. Rajamouli व कुटुंबातील सदस्यांना कोरोना विषाणूची लागण; डॉक्टरांचा होम क्वारंटाइनचा सल्ला
SS Rajamouli (Photo Credits: Twitter)

देशामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. आता कोरोनाने सामान्य नागरिकांपासून अनेक सेलेब्जच्या घरापर्यंत मजल मारली आहे. बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आल्यावर सर्वांनाच धक्का बसला होता. आता माहिती मिळत आहे की लोकप्रिय चित्रपट बाहुबलीचे (Baahubali) दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः राजामौली यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून, हे सर्वजण होम क्वारंटाइनमध्ये आहेत.

राजामौली यांनी ट्वीट करत सांगितले. ‘मला व माझ्या कुटुंबातील सदस्यांना काही दिवसांपूर्वी थोडासा ताप आला होता. कालांतराने हा ताप निघून गेला परंतु तरीही आम्ही कोरोना विषाणूची चाचणी करून घेतली. आज आलेल्या रिपोर्टनुसार सौम्य कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आम्ही होम क्वारंटाइनमध्ये आहोत.’ राजामौली यांनी पुढे सांगितले की, ‘कुटुंबीय पूर्ण रिकव्हर होण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत आणि अशा करतो की लवकरच या व्हायरसशी झुंज देणाऱ्या इतरांना मदत करण्यासाठी आम्ही प्लाझ्मा डोनेट करू शकू. (हेही वाचा: सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका Bhakharwadi च्या स्टाफ मेंबरचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू; सेटवरील 8 जणांना कोरोनाची लागण- रिपोर्ट्स)

पहा ट्वीट -

या वृत्तानंतर राजामौली यांच्या फॅन्सनी सोशल मीडियावर कमेंट करत, एस.एस. राजामौली आणि त्यांचे कुटुंब लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, राजामौली 'आरआरआर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. हा चित्रपट सुमारे 400 कोटी रुपये खर्चून बनवला जात आहे. या चित्रपटात बाहुबलीसारखा भव्य सेट पाहायला मिळणार आहे. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या मुख्य भूमिकांसह, 'आरआरआर' मध्ये राम चरण आणि आलियाची नवीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.