
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) पुन्हा एकदा त्यांच्या विधानांमुळे वादात सापडले आहेत. यावेळी हे प्रकरण खूप गंभीर आहे, कारण त्यांनी सोशल मीडियावर ब्राह्मण समुदायाबद्दल अतिशय आक्षेपार्ह टिप्पणी (Anurag Kashyap Derogatory Comment on Brahmins) केली आहे, ज्यामुळे आता बराच गोंधळ उडाला आहे. हा संपूर्ण वाद काय आहे आणि लोक त्यावर का नाराज आहेत, हे जाणून घेऊयात. अनुराग कश्यपने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या आगामी 'फुले' चित्रपटाचे समर्थन केले. त्यांनी असा दावा केला की सेन्सॉर बोर्डाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटाच्या काही भागांवर, विशेषतः ब्राह्मण समुदायाच्या चित्रणावर आक्षेप घेण्यात आला होता.
अनुराग कश्यप यांच्या मते, सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे की, मोदीजी म्हणाले आहेत की भारतातून आता जातीयवाद संपला आहे. यावर अनुरागने प्रश्न उपस्थित केला की, जर जातीयवाद संपला असेल तर ब्राह्मण समाज का विरोध करत आहे?
अनुराग कश्मप नेटकऱ्यांशी भिडला
View this post on Instagram
अनुरागच्या या कमेंटवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका युजरने त्याला ट्रोल करत लिहिले, 'ब्राह्मण तुमचे वडील आहेत का. तुम्ही त्यांच्याशी जितके भिडताल तितके ते तुम्हाला जाळून टाकतील.' अनुराग कश्यपनेही यावर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले, 'ब्राह्मण पे मैं मू*गा... कोई प्रॉब्लम?' अनुरागचं हे आक्षेपार्ह विधान आगीसारखं पसरलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड निषेध सुरू झाला.
अनुराग कश्यपचे अपमानजनक शब्द -
इंटरनेटवर पेटला वाद -
सोशल मीडियावर उडाला गोंधळ -
अनुरागच्या या टिप्पणीनंतर ब्राह्मण समाजातील अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर #BoycottAnuragKashyap आणि #ArrestAnuragKashyap सारखे हॅशटॅग ट्रेंड करू लागले. अनेक वापरकर्त्यांनी त्याला द्वेष पसरवणारा म्हटले असून काहींनी त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणीही केली आहे.