The Kashmir Files (Photo Credit - Instagram)

मुंबई मध्ये नुकताच फिल्मफेअर 2023 (Filmfare Awards 2023) चा रंगारंग सोहळा पार पडला. परंतू ' द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) च्या दिग्दर्शकापाठोपाठ आता अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनीही या पुरस्कार सोहळ्यावर बोचरी टीका केली आहे. सोशल मीडीयामध्ये त्यांनी पोस्ट शेअर करताना 'इज्जत एक महंगा तोफा है इसकी उम्मीद सस्ती लोगों से ना करे' असा कोट शेअर केला आहे. अर्थात 'प्रतिष्ठा ही एक मौल्यवान गोष्ट आहे त्याची अपेक्षा 'स्वस्त' लोकांकडून करू नये.' या कोट सोबत खेर यांनी #TheKashmirFiles हा हॅशटॅग वापरला आहे.

यंदा फिल्मफेअर मध्ये द कश्मीर फाईल्स ला 7 नॉमिनेशन मिळाली होती. त्यामध्ये अनुपम खेर यांना बेस्ट अ‍ॅक्टर लिडिंग रोल चं नामांकन होतं. हा पुरस्कार Rajkummar Rao ने Badhaai Do साठी पटकावला. Filmfare Awards 2023 Winners: मुंबईत 68 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा संपन्न, संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीने जिंकले 10 पुरस्कार, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी .

पहा अनुपम खेर यांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर फिल्मफेअर मध्ये 'द कश्मीर फाईल्स' कडे दुर्लक्ष करण्यात आल्याची चर्चा आहे. विवेक अग्निहोत्री यांनी फिल्मफेअरला “अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार” म्हणून संबोधून त्यांनी कार्यक्रमापूर्वी एक मोठी नोट लिहिली होती.

विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा सोबत स्वतः विवेक अग्निहोत्री यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीमध्ये नामांकन असा काश्मीर फाइल्स 6-7 श्रेणींमध्ये पुरस्कारांच्या शर्यतीत होता. मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांनाही चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते. पण कोणालाच पुरस्कार मिळालेला नाही.