Ankita Lokhande: अभिनेत्री अंकिता लोखंडे बड्या प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार 'ही' व्यक्तिरेखा

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बिग बॉसनंतर (Bigg Boss) बड्या प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  नुकतंच अंकिताने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर केली आहे. निर्माता संदीप सिंगच्या नव्या वेब शोमधून अंकिता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अंकिताच्या नव्या वेब शोचं नाव आम्रपाली असं असून निर्माता संदीप सिंगने या सिनेमाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली. (हेही वाचा - Bohada Movie: 'बोहाड्या'ची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिनेमाची घोषणा)

आम्रपालीही मनमोहक मालिका शाही नगरवधूच्या न सांगितल्या जाणाऱ्या गाथेचा अभ्यास करते, तिच्या भावना आणि आव्हानांनी भरलेला प्रवास प्रकट करते. या मालिकेतून संगीतकार इस्माईल दरबार पुनरागमन करत आहेत."  बौद्धकालीन इतिहासात उल्लेख असलेली वैशालीनगर राज्याची नगरवधू आम्रपालीची जीवनकहाणी या वेब सिरीजमधून उलगडणार आहे. पहिल्यांदाच आम्रपाली या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची कथा वेब शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by SANDEEP SINGH (@officialsandipssingh)

 

शेअर केलेल्या पोस्टरमधील अंकिताचा लूक अनेकांना पसंत पडला. अनेकांनी कमेंट करत तिचा हा लूक आवडल्याचं म्हंटल. स्वतंत्रवीर सावरकर या सिनेमाची सहनिर्मिती निर्माता संदीप सिंगने केली होती. या सिनेमात अंकिताने साकारलेली यमुनाबाई ही भूमिका सुद्धा खूप गाजली.त्यानंतर आता आम्रपाली या भूमिकेत अंकिताला पाहण्यासाठी सगळेचजण खूप उत्सुक आहेत.