बॉलिवूडचा महानायक, शहेनशहा, बिग बी यांसारख्या अनेक नावांनी उल्लेखून चाहत्यांनी ज्यांना डोक्यावर घेतले ते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या एका गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनी दिला आहे. त्यांचे हे विधान ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. आज भलेही ते 76 वर्षांचे झाले असले तरी कामाप्रती त्यांची ओढ, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची मेहनत वाखाखण्याजोगी आहे. सिनेजगतातील त्यांची कारकिर्द पाहता त्यांची करावी तेवढी स्तुती कमीच आहे. असे हे हरहुन्नरी बिग बींचे 75% यकृत खराब झाले असल्याचे त्यांनी एक शो दरम्यान सांगितले आहे.
NDTV वृत्तवाहिनीवर एका शो मध्ये आलेले अमिताभ बच्चन असे म्हणाले आहेत की, "प्रत्येकाने आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी आर्वजून घेतली पाहिजे. त्यात पुढे स्वत:विषयी खुलासा देताना ते म्हणाले की, माझे 75% यकृत खराब झाले असून मी केवळ 25% यकृताच्या आधारावर जगत आहे. मला ट्यूबरक्लोसिस (टीबी) आणि हेपेटाइटिस बी हा आजार झाला आहे."
बिग बीं नी पुढे असेही सांगितले की, या आजाराचे वेळीच निदा कळले तर यावर उपचार घेऊन हा आजार बरा होता. आपल्या आरोग्याबाबत नेहमीच आग्रही असलेले अमिताभ बच्चन यांच्या आजाराविषयी असंख्य चाहत्यांना धक्काच बसला आहे.
याच कारणामुळे सध्या मोठ्या पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे अमिताभ मोर्चा वळविला आहे. कौन बनेगा करोडपति 11 (KBC 11)वे सीझन सुरु झाले असून, अमिताभची हवा आजही कायम आहे असच म्हणावं लागेल.