Viral Video : आलिया भट्टमुळे रणबीर कपूरला घडले आजीचे अंतिमदर्शन
आलिया भट्ट (Photo Credit : Instagram)

दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नीचे कृष्णा राज कपूर यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. अत्यंदर्शनासाठी कपूर कुटुंबीयांसह बॉलिवूडकरही उपस्थित होते. मात्र या प्रसंगी कृष्णा कपूर यांचा नातू रणबीर कपूर उपस्थित राहू शकले नाहीत. पण आजीच्या अंत्यदर्शनाला उपस्थित राहू न शकल्याची सल थोडी कमी झाली ती आलिया भट्टमुळे.

कृष्णा कपूर यांच कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. निधनाची खबर कळताच कपूर कुटुंबियांसह सर्व बॉलिवूडचे अनेक कलाकार अंत्यदर्शनासाठी पोहचले. पण रणबीर कपूर सध्या अमेरिकेत असल्यामुळे त्याला अत्यंविधीसाठी घटनास्थळी पोहचणे शक्य झाले नाही. त्यावेळी आलियाने रणबीरला व्हिडिओ कॉल केला आणि रणबीरला आजीला शेवटचं पाहता आलं.

नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे रणबीरसोबतचा संपर्क अनेक वेळा तुटत होता. पण आलिया वारंवार रणबीरला फोन ट्राय करत होती. आलियाचा हा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद्य झाला असून आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऋषी कपूर आजारी असल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे रणबीरदेखील त्यांच्यासोबत अमेरिकेमध्ये गेला आहे. याची माहिती ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी दिली होती.