File Picture of Indian actor Akshay Kumar (Photo Credits: IANS)

Forbes List Of Highest Paid Celebrities In The World: अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बॉलिवूडचा असा एक सुपरस्टार आहे जो दरवर्षी 4-5 चित्रपट करतो आणि हे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात. अक्षय कुमारने गेल्या वर्षी 'केसरी', 'मिशन मंगल', 'हाऊसफुल 4' आणि 'गुड न्यूज' सारख्या  मोठ्या धमाकेदार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली चमक दाखविली होती. आता 2020 ची सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी आली आहे व या यादीमध्ये अक्षय कुमार या एकमेव भारतीय सेलिब्रिटीचे नाव आहे. अक्षय कुमारला या यादीत 52 वी स्थान मिळाले आहे करापूर्वी त्याचे उत्पन्न 4.8 कोटी डॉलर, म्हणजेच जवळजवळ 362 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

यावर्षी किम कर्दाशियानची बहीण काइली जेनर (Kylie जेनर) या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे. काइली आता अब्जाधीश नसली तरी तिची वर्षभराची कमाई जगातील इतर कलाकारांपेक्षा जास्त आहे. काइलीने एका वर्षात 590 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत. काइली पहिल्या क्रमांकावर असताना किम कर्दाशियानचा नवरा कान्ये वेस्ट (Kanye West) दुसर्‍या क्रमांकावर आहे आणि किम स्वत: या यादीत 48 व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये पहिल्या दहा क्रमांकावर असलेल्या सेलेब्जमध्ये - कायली जेनर, कान्ये वेस्ट, रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेबरॉन जेम्स, ड्वेन जॉन्सन यांचा समावेश आहे.

(हेही वाचा: अक्षय कुमार याने मुंबई पोलीस आणि डॉक्टरांच्या कार्याला सलाम करत 'रख तू हौंसला' म्हणणारे शेअर केले नवे गाणे)

या यादीमध्ये अक्षय कुमार एकमेव भारतीय आहे, ज्याने फोर्ब्स 2020 च्या यादीत स्थान मिळवले आहे. अक्षय कुमारने वर्ष 2019 च्या फोर्ब्स च्या सर्वाधिक पैसे घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीतही प्रवेश केला होता व तेव्हा तो 33 व्या स्थानावर होता. अक्षय कुमारशिवाय प्रियंका चोप्राचा पती निक जोनससुद्धा या यादीमध्ये आहे. फोर्ब्स 2020 च्या यादीत निक जोनास आणि त्याचा भाऊ जो आणि केविनचा बँड जोनस ब्रदर्स 20 व्या स्थानावर आहे. अक्षयने कोनोर मॅकग्रेगर, जेनिफर लोपेझ, विल स्मिथ, रिहाना, जॅकी चॅन, अ‍ॅडम सँडलर, लेडी गागा यांनाही मागे टाकले आहे.