Ajay Devgn's Thahar Ja Song | (Photo Credits: YouTube)

कोरोना व्हायरस (Coronavirus) या जागितक संकटाचा संपूर्ण भारत देश सामना करत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशाने लॉकडाऊनचा (Lockdown) मार्ग अवलंबला आहे. संपूर्ण देश लॉकडाऊनच्या स्थितीत असताना बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) याचे एक नवे गाणे समोर आले आहे. 'ठहर जा' (Thahar Ja) असे या गाण्याचे बोल असून कोविड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी काही काळ घरीच थांबा असा संदेश गाण्यातून देण्यात आला आहे. आतापर्यंत आपल्या लोकांसाठी आपण खूप धावपळ केली, कष्ट घेतले आता आपल्याच लोकांसाठी थांबण्याची वेळ आली आहे, अशा आशयाचे हे गाणे आहे. मनाला स्पर्श करणारे अजय देवगणचे खास गाणे प्रेक्षकांनाही विचार करायला भाग पाडेल.

अजय देवगन याने हे गाणे लॉकडाऊन दरम्यान शूट केल्यामुळे स्वाभाविकच याचे शूटिंग केले घरीच केले असणार. दरम्यान कोरोनाच्या संकट काळात आपल्या स्वास्थ्य आणि सुरक्षेसाठी झटणारे पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार यांसह विविध स्तरातील कोरोना योद्धांची झलक गाण्यात पाहायला मिळत आहे. सलमान खान याच्या आवाजातील Coronavirus Pandemic वरील गाणे चाहत्यांच्या भेटीला (Watch Video)

पहा व्हिडिओ:

अजय देवगण याचे हे गाणे मुकुल व्यास याने गायले आणि संगीतबद्ध केले आहे. गाण्याचे बोल अनिल वर्मा यांचे आहेत. खुद्द अजय देवगण याने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्यात अजय देवगण याचा मुलगा युग देखील काही क्षण दिसतो. तसंच युगने गाण्याच्या निर्मितीत अजयची मदत देखील केली आहे.  बॉलिवूड कलाकारांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठी आर्थिक मदत केली आहे. तसंच नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन विविध माध्यमातून केले आहे.