अजय देवगन याचे मुंबईतील कोविड-19 हॉटस्पॉट धारावी येथे मदतीचे आवाहन; पहा ट्विट
Ajay Devgn (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका मुंबई (Mumbai) शहराला बसला आहे. मुंबईतील धारावी झोपटपट्टी हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. दिवसागणित तेथील रुग्णसंख्या, मृतांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सरकारही धारावीकडे विशेष लक्ष पुरवत आहे. त्यातच बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगन (Ajay Devgn) याने कोरोना हॉटस्पॉट (Corona Hotspot) धारावी (Dharavi) मध्ये मदतीचे आवाहन केले आहे. परंतु, तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने स्वतः 700 कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. (Coronavirus Pandemic विरुद्ध लढण्यासाठी अजय देवगन आणि ऋतिक रोशन यांचे COVID-19 Survivors ना रक्तदान करण्याचे आवाहन)

मदतीचे आवाहन करण्यासाठी अजयने खास ट्विट केले आहे. त्यात तो लिहितो, "धारावी हे कोविड 19 संसर्गाचे केंद्र बनले आहे. अनेक नागरिक MCGM च्या आधारे अहोरात्र काम करत आहेत. अनेक NGOs गरजुंना राशन आणि हायजीन कीट्स पुरवत आहेत. आम्ही (ADFF) 700 कुटुंबांना मदत करत आहोत. तुम्ही देखील पुढे या आणि दान करा, असे मी तुम्हाला आवाहन करतो."

अजय देवगन ट्विट:

यापूर्वीही अजय देवगन याने सामाजिक भान राखत कोरोना संकटात मदतीचा हात पुढे केला होता. विशेष म्हणजे अजयचे लॉकडाऊन काळात विशेष गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तसंच स्थलांतरित मजूरांना देशातील विविध ठिकाणी पोहचवण्यासाठी मदत करणाऱ्या सोन सूद याचे कौतुकही अजय देवगन याने केले होते. त्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये त्याने लिहिले, "स्थलांतरित मजूरांना स्वगृही सुरक्षित पोहचवण्यासाठी ज्याप्रकारे तु मदत करत आहेस ते अतिशय प्रशंसनीय आहे. यासाठी तुला अधिक शक्ती मिळो." यानंतर सोनू सूद याने अजय देवगनला धन्यवाद दिले होते.