Attacked On Punjabi Singer: सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) नंतर आता आणखी एका गायकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनातून देश सावरला नसताना आणखी एका कलाकाराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. हनी सिंग (Honey Singh) ने इंस्टाग्रामवर पोस्ट करून या गायकावर झालेल्या हल्ल्याची बातमी शेअर केली आहे. सिद्धू मुसेवालानंतर आता प्रसिद्ध गायक अल्फाज (Alfaaz) ला टार्गेट करण्यात आले असून हनी सिंगने त्याचा फोटो शेअर करत धक्कादायक बातमी चाहत्यांसाठी दिली आहे.
हनी सिंगने अल्फाजचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. ज्याने हे कृत्य केले आहे, त्याला मी सोडणार नाही, असे हनी सिंगने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. अल्फाजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. (हेही वाचा - Adipurush Teaser: थक्क करणारी दृश्य आणि डोळे दिपवणारे VFX, प्रभासच्या आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित)
अल्फासवर हल्ला केव्हा आणि कसा झाला?
शनिवारी रात्री अल्फाज त्याच्या काही मित्रांसह जेवण करण्यासाठी ढाब्यावर पोहोचला असता, ग्राहक आणि ढाब्याच्या मालकामध्ये पैशांवरून वाद झाला. जेव्हा ग्राहक तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा अल्फासने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि रागाच्या भरात त्यांनी गायकावर हल्ला केला.
विशाल असे हल्लेखोराचे नाव असून त्याच्याविरुद्ध मोहाली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अल्फासच्या टीमने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम 279, 337,338 अंतर्गत सोहाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Punjabi singer Alfaaz admitted to a private hospital in Mohali, Punjab after getting injured.
(Photo Courtesy: Alfaaz's Instagram account) pic.twitter.com/eFfgGoGZQL
— ANI (@ANI) October 3, 2022
मोहाली पोलिसांनी केली आरोपीला अटक -
काही तासांपूर्वी हनी सिंगने आणखी एक पोस्ट केली आणि सांगितले की, हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले आहे. हनी सिंहने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मोहाली पोलिसांनी काल रात्री टेम्पो ट्रॅव्हलरसह अल्फाजवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडले आहे. त्यांचे अनेक आभार. अल्फास आता धोक्याबाहेर आहे. या पोस्टर चाहत्यांनी कमेन्ट्समध्ये अल्फास लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.