Actor Hemant Birje Car Accident: पुण्याच्या उर्से टोलनाक्याजवळ अभिनेते  हेमंत बिर्जे यांच्या कारला अपघात
Actor Hemant Birje | PC: ANI

मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) अभिनेता हेमंत बिर्जे (Hemant Birje)यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई कडून पुण्याला जात असताना हा अपघात झाला असून त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि लेक देखील प्रवास करत होते. या अपघातामध्ये हेमंत बिर्जे जखमी झाले आहेत. हेमंत बिर्जे हे 1985 मध्ये आलेल्या 'Adventures of Tarzan' सिनेमामधून लोकप्रिय झाले होते.

पुण्याच्या उर्से टोलनाक्याजवळ हेमंत यांची गाडी डिव्हायडरला आदळली. त्यामुळे हेमंत सह त्यांची पत्नी आणि मुलीला देखील दुखापत झाली आहे. हे देखील नक्की वाचा: Rekha Kamat Passes Away: अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड; 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन .

एबीपी माझाच्या रिपोर्ट्सनुसार, हेमंत यांना सर्दी झाली होती. त्यामुळे त्यांनी सर्दीची औषधं घेतली होती. प्रवासादरम्यान या औषधांमुळे त्यांना डुलकी लागत होती आणि त्यामध्येच त्यांची गाडी डिव्हायडरला आदळली. अपघतानंतर तिघांनाही नजिकच्या रूग्णालयामध्ये नेण्यात आले आहे.

दरम्यान हेमंत बिर्जे अनेकदा अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या सिनेमांमध्ये झळकले आहेत. 2005 साली ते सलमान खानच्या 'गर्व: प्राईड अ‍ॅन्ड हॉनर' मध्ये देखील झळकले होते. सोबतच काही मल्याळम आणि तेलगू सिनेमांचाही ते भाग होते.