सोनू निगम, अदनान सामी (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर गायक सोनू निगम याने संगीत क्षेत्रातील काही पडद्यामागील गोष्टी उघड केल्या आहे. युट्युबच्या माध्यमातून सोनू निगमने उठवलेल्या अन्यायाविरुद्धच्या आवाजाचा व्हिडिओ चर्चेमध्ये आहे. आता सोनूच्या सुरात सुर मिसळत गायक, संगीतकार अदनान सामीने (Adnan Sami) देखिल आपला आवाज बुलंद केला आहे. एका इंस्टाग्राम पोस्टवर त्याने सध्या हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि संगीत क्षेत्राला गांभीर्याने हलवण्याची गरज आहे. संगीत क्षेत्रातही गायक, संगीतकार यांचं शोषण होते.

अदनान सामीच्या मते, संगीतक्षेत्रात आता क्रिएटिव्हिटीची जाण देखील नसलेल्यांकडून ती कंट्रोल केली जाते. कृपा करून या प्रकाराला आळा घाला. असली टॅलेंट आणि दिग्गज कलाकारांना श्वास घेण्यासाठी जागा द्या. अनेक जण स्वत: ला 'देवास्वरूप' मानतात. पण कोणी क्रिएटीव्हिटी आणि आर्टला रोखू शकत नाही हे इतिहासामधूनही ते शिकलेले नाहीत. आता खूप झाले. पण आता बदल जवळ आला आहे. तो दरवज्यावर टकटक करतोय. तुम्ही तयार नसाल तरीही तो आला आहे. वेळीच सावध व्हा.

अदनान सामीची पोस्ट

सुशांत सिंह राजपूत याने मागील आठवड्यात राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान त्याच्या आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झाले नसले तरीही काहींच्या मते तो बॉलिवूडमधील कंपुशाही, नेपोटिझम याच्यामुळे नाराज होता. अनेक बड्या कलाकारांमुळे त्याला फटका बसला होता. त्यामुळे सुशांतच्या निधनानंतर अनेकांनी झगमगत्या बॉलिवूड विश्वातील काळी बाजूदेखील समोर आणली आहे. अनेकांनी त्यांना मिळत असलेल्या दुय्यम वागणूकीविरोधात आवाज उठवला आहे.