अभिनेत्री गहना वशिष्ठ वेब सीरिजचं शूटींग करताना सेटवरून कोसळली; रुग्णालयात देतीय मृत्यूशी झुंज
Actress gahina vasisth (PC - Instagram)

'गंदी बात' या वेबसीरिजची मुख्य अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gahina Vasisth) शूटींगदरम्यान सेटवरून कोसळली. गहनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी शूटींग चालू असताना तिला भोवळ आली आणि ती खाली कोसळली. गहनावर मुंबईच्या एका रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गहनाला व्हेंटिलेटर आणि इतर सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे. शूटींगदरम्यान, गहनाने कोणताही पौष्टिक आहार घेतला नव्हता. तिने केवळ एनर्जी ड्रिंक्स घेऊन 48 तास शूटींग केले होते. अनेकदा शूटींग करताना अपघात होतात. यात अनेक कलाकरांना इजा होण्याचे प्रकारही घडले आहेत. गहना एक मधुमेहाची रुग्ण आहे. शूटींगदरम्यान तिचा बीपी कमी झाला आणि ती सेटवर कोसळली. तिने शूटींगदरम्यान काही औषध घेतली होती का? किंवा इतर कारणांमुळे तिची प्रकृती बिघडली का? हे सर्व प्रश्न सध्या कोड्यात आहेत.

गहना वशिष्ठ इन्स्टाग्राम पोस्ट - 

गहना वशिष्ठ स्टार प्लसवरील मालिका ‘बहने’मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच तिने 2012 मध्ये 'मिस एशिया बिकिनी' कॉन्टेस्ट जिंकली होती. मागच्या 5 वर्षांत गहनाने 30 पेक्षा जास्त दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच गहना अल्ट बालाजीच्या ‘गंदी बात’ आणि ‘उल्लू एप’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती.