Sara Ali Khan (Photo Credit: ANI)

सुशांतसिंह  राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करत आहे. याचप्रकरणी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), सारा अली खान (Sara Ali Khan) यांना समन्स बजावले होते. त्यानुसार, आज तिघींची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, जवळपास साडेपाच तासाच्या चौकशीनंतर दीपिकाची आजची चौकशी संपली आहे. दीपिका दुपारी चारच्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडली. यानंतर संध्याकाळी 5.45 च्या सुमारास सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकसी पूर्ण झाली असून दोघीही एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडल्या आहेत.

सुशांतसिंह राजपूत हा ड्रग्जचे सेवन करायचा, अशी कबुली अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरने एनसीबीच्या चौकशीत दिली आहे. या चौकशीत या दोन्ही अभिनेत्रींनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सारा आणि श्रद्धा कपूरची चौकशी संपली असून श्रद्धाची साडेपाच तर, साराची साडेचार तास चौकशी करण्यात आली आहे. सारा एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडली असून घरी जाण्यासाठी रवाना झाली आहे. हे देखील वाचा- Bollywood Drugs Case: अभिनेत्री दीपिका पादुकोण पाच तासांच्या चौकशीनंतर अखेर NCB कार्यालयातून बाहेर पडली, ड्रग्ज प्रकरणाबाबत झाली चौकशी

एएनआयचे ट्विट-

फोटो-

फोटो- 

सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर एनसीबीने कारवाई केली असून सध्या ती तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वी रियाने ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे घेतल्याची माहिती समोर आली होती. रियाने बॉलिवूडमधील अनेक पार्टयांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचा खुलासा केल्याचे वृत्त होते.