'पीके', 'रॉक ऑन' सारख्या हिंदी चित्रपटामध्ये भूमिका साकारणारा अभिनेता साई गुंडेवार (Actor Sai Gundewar) याचे रविवारी अमेरिकेत (US) निधन झाले. 22 फेब्रुवारी 1978 रोजी जन्मलेला साई गेल्या एका वर्षापासून ब्रेन कॅन्सरशी (Brain Cancer) झुंज देत होता, मात्र 10 मे रोजी ही लढाई संपली. साईच्या मृत्यूवर त्याचे मित्र आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही या कलाकाराला श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्रातील नागपुरात जन्मलेला अभिनेता आणि मॉडेल साई याने हॉलिवूडमध्ये टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
अनिल देशमुख यांनी आपल्या श्रद्धांजलीमध्ये लिहिले आहे. ‘पी. के. सारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते साईप्रसाद गुंडेवार यांची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीने हरहुन्नरी अभिनेता गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!’ काही अहवालांनुसार, साईचे फेब्रुवारी 2019 मध्ये अमेरिकेतील एल.ए. येथे मेंदूच्या कर्करोगाचे ऑपरेशन झाले होते आणि तो तिथेच राहत होता.
पी. के. सारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते साईप्रसाद गुंडेवार यांची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीने हरहुन्नरी अभिनेता गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/oHg8qDq4UF
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 10, 2020
ग्रीनकार्ड न मिळाल्याने साई 2007 साली भारतात परत आला. पुढे स्प्लिट्सविला 4 (Splitsvilla Season 4) नंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पीके, पप्पू कांट डान्स साला, रॉक ऑन, लव ब्रेकअप जिंदगी, डेव्हिड, बाजार आणि आय मी और मैं अशा चित्रपटांमध्ये साईने काही छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय 2016 मध्ये आलेल्या ‘अ डॉट कॉम मॉम’ या मराठी चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. (हेही वाचा: Crime Patrol फेम अभिनेते शफीक अन्सारी यांचे 52 व्या वर्षी निधन; कर्करोगाने होते त्रस्त)
अभिनयासोबत साई मुंबईत अन्न पुरवणाऱ्या ‘फूडजिम’ या संस्थेचा सह-संस्थापकही होता. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे.