Thugs of Hindostan च्या अपयशाची जबाबदारी पूर्णपणे माझी- आमिर खान (Video)
आमिर खान (File Photo)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' (Thugs of Hindostan) हा बहुचर्चित सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. सिनेमाच्या ट्रेलर, लूक, गाण्यांनी सिनेमाविषयीच्या अपेक्षा वाढवल्या होत्या. पण प्रेक्षकांच्या अपेक्षांना खरे उतरु न शकल्याने सिनेमा फ्लॉप झाला. मात्र सिनेमाच्या अपयशाची जबाबदारी पूर्णपणे माझी असल्याचे अभिनेता आमिर खानने म्हटले आहे.

आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ अशी तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमाची कथा प्रेक्षकांचे मनोरंजन करु शकली नाही. सिनेमाच्या सगळ्या अपयशाची जबाबदारी माझी असल्याचे आमिर खानने एका कार्यक्रमादरम्यान म्हटले. सिनेमाकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या मात्र मी त्या पूर्ण करु शकलो नाही हे माझे अपयश आहे.

मात्र काही लोकांना सिनेमा आवडला त्यांचे आभारही आमिर खानने यावेळी मानले. तसंच लवकरच हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित होणार असून तेथील लोकांचा काय प्रतिसाद असेल, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही आमिर खान म्हणाला. तसंच चाहत्यांना निराश केल्याबद्दल त्याने त्यांची माफीही मागितली आणि पुढील वेळी नक्कीच कठोर परिश्रम घेऊ, अशी कबुलीही दिली.

सिनेमा प्रदर्शित होऊन 2 आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही सिनेमाने आतापर्यंत 150 कोटींचा गल्ला केला आहे.