बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्संना आपल्या तालावर थिरकायला लावणारा दिग्दर्शक रेमो डिसूजा (Remo D'souza) याला 11 डिसेंबरला अचानक हृदयविकाराचा झटका आला. या बातमीने त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूडसृष्टीत एकच खळबळ उडाली. मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात योग्य ते उपचार घेतल्यानंतर त्याची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती त्याची पत्नी लिझेल (lizelle) आणि त्याला रुग्णालयात भेटायला गेलेल्या त्याच्या मित्रपरिवाराने दिली. रेमोची प्रकृती स्थिर असल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र रुग्णालयात तो कसा आहे असा प्रश्न अनेक जण सोशल मिडियाद्वारे विचारत आहे. अनेकांना त्याला पाहण्याची इच्छा आहे. दरम्यान अभिनेता आमीर अली (Aamir Ali) याने रुग्णालयात त्याला भेटायला गेला असता त्याच्यासोबत छान फोटोज काढले आहेत.
आमीर अली ने रेमोसोबत रुग्णालयात काढलेले फोटोज शेअर करून त्या पोस्ट केली 'My Brother is Back' असे लिहिले आहे. यात रेमो पाठमोरा उभा असून दोन्ही हात वर करुन आपण फिट असल्याचे संकेत आपल्या चाहत्यांना दिले आहेत.हेदेखील वाचा- Remo D'souza Health Update: रेमो डिसूझा याच्या प्रकृतीबाबत त्याची पत्नी लिझेलने दिली 'अशी' माहिती
View this post on Instagram
तसेच आमिरही फोटोमध्ये Thumb दाखवून रेमो अगदी फिट असल्याचे सांगितले आहे. आमिर अली शिवाय अन्य बरेच कलाकार रेमोला भेटायला गेले होते. कोरियोग्राफर धर्मेश, कृति महेश, सलमान युसूफ खान असे बरेच जण त्याला भेटायला गेले आहेत. तसेच नुकतेच लग्न झालेला पुनित पाठक सपत्नीक रेमो डिसूजा याला रुग्णालयात भेटायला गेला होता.
रेमो न केवळ एक उत्तम कोरिओग्राफर आहे तर एक माणूस म्हणूनही खूप जबरदस्त आहे. त्याने आतापर्यंत अनेक स्ट्रगलर कलाकारांचे करियर घडवले आहे. त्यात धर्मेश, पुनीत ही नाव आर्वजून समोर येतात. कोरियोग्राफर धर्मेश सर त्यांना आपला देव मानतो. रेमोसाठी जगभरातील त्याचे असंख्य चाहते त्याचा सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.