49th International Film Festival Of India : आजपासून गोव्यामध्ये होणार सुरु
49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव ( फोटो सौैजन्य - Ministry of Information and Broadcasting )

49th International Film Festival Of India आजपासून पणजीमध्ये सुरु होणार आहे. तसेच या सोहळ्याचे दिमाखदार उद्घाटन आज संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून दाखविण्यात येणार आहे.

बांबोळी येथील श्मामप्रसाद मुखर्जी सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. तर या चित्रपटमोत्सवाच्या वेळी नव्या भारताचे दर्शन ही संकल्पना चित्रपटांच्या माध्यमातून दाखविली जाणार आहे. तसेच 90 मिनिटांच्या या कार्यक्रमात भारतीय चित्रपट संस्कृती आणि पंपरेचे विविध रंग व समृद्ध चित्र यावेळी साकारले जाणार आहे. या चित्रपट मोहोत्सवात इतिहास, अॅक्शन आणि रोमान्स अशा विविध संकल्पनांवरील चित्रपट पाहायला मिळणार आहेत. तर या सोहळ्याला गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित राहणार आहेत. तसेच बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकसुद्धा या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावणार आहेत.

या चित्रपट मोहत्सवाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरुन आणि पीआयबीच्या युट्युब चॅनलवरुन पाहता येणार आहे. तर या सोहळ्याचा शुभारंभ ‘द अस्पर्न पेपर्स’ या चित्रपटातील काही दृश्ये दाखवून केला जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेचे ज्यूरी आणि पोलीश दिग्दर्शक रॉबर्ट ग्लिन्सकी हे  यावेळी आपले विचार मांडतील. इतर ज्यूरी सदस्यही यावेळी उपस्थित असतील.