
बिग बॉस मराठी 2 फेम पराग कान्हेरे (Parag Kanhere) विवाहबंधनात अडकण्यात सज्ज झाला आहे. मागील काही दिवसांपासून मुक्ता भातखंडे (Mukta Bhatkhande) या तरूणीला तो डेट करत होता. तिच्यासोबतचे काही खास फोटो त्याने अनेकदा शेअर केले होते. त्यामुळे या लव्हबर्डची सोशल मीडियामधील त्याच्या फॅनग्रुप्स मध्ये चर्चा होती. अखेर आज (13 मार्च) त्याने इंस्टाग्रामवर लग्नापूर्वीच्या हळदीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पराग कान्हेरे हा लोकप्रिय शेफ असून बिग बॉस मराठी 2 मधून तो चर्चेमध्ये आला होता. बिग बॉस मराठीमध्ये त्याच्या रागीट स्वभावात महिला सह स्पर्धकांसोबत केलेल्या गैरवर्तवणूकीमुळे त्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. सोबतच बिग बॉस मराठी 2 मध्ये सुरूवातीच्या काही भागांमध्ये पराग कान्हेरे आणि रूपाली भोसले यांच्यामध्ये जवळीक पहायला मिळाली होती. मात्र या शो नंतर रूपाली- परागच्या चर्चा हळूहळू विरल्या. मात्र आता तो मैत्रिण मुक्तासोबत विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे.
पराग कान्हेरे आणि मुक्ता भातखंडे यांच्या लग्नापूर्वीच्या काही विधींचे, मेहंदी सोहळ्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. Bigg Boss फेम शेफ पराग कान्हेरे च्या आयुष्यात आला लव्ह तडका; इंस्टाग्राम वर दिली प्रेमाची कबुली.
पराग कान्हेरेच्या हळदीचे फोटो
मुक्ता भाताखंडे नववधूच्या रूपात
मुक्ता भातखंडेच्या मेहंदीचे फोटो
View this post on Instagram
#mendhi#weddingbells🔔#weddingseason2020#positivity#amazingdesign#loveformendhi#😘❤️🥰😍😊👌🏻🌹
लग्न सोहळ्याचे फोटो
दरम्यान पराग कान्हेरे याचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. दरम्यान पराग कान्हेरे हा मूळचा पुण्याचा असून लोकप्रिय शेफ आहे. त्याच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहे.