Avengers 4 End Game Trailer: 'अॅव्हेंजर्स 4'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?
अॅव्हेंजर्स 4 (Photo Credits: Youtube)

बहुप्रतीक्षेनंतर मार्व्हलच्या 'अॅव्हेंजर्स 4 अॅंड गेम' (Avengers 4 End Game) चा ऑफिशिअल ट्रेलर आज (शुक्रवार, 7 डिसेंबर) प्रदर्शित झाला. हा ट्रेलर इंटरनेटवर रिलिज झाला असून, आपण तो यूट्यूब (YouTube) वर पाहू शकता. या चित्रपटाचा या आधीचा भाग 'अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर्स' (Avengers : Infinity Wars) ला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वेलचा ट्रेलर लॉन्च करताना सस्पेन्स क्रिएट करण्यात आला होता. ट्रेलर तर रिलीज झाला पण, प्रेक्षकांना खरी उत्सुकता आहे चित्रपट प्रदर्शित होण्याची. (हेही वाचा : फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी)

दरम्यान, अत्यंत थरारक आणि उत्कंटा वाढवणारा हा ट्रेलर असून, अनेकांनी त्याचे कौतुकही केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते की, चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची कहाणी एका नव्या पद्धतीने आणि तितक्याच नाट्यपूर्ण पद्धतीने मांडली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अँथनी रुसो आणि जो रुसो यांनी केले आहे. हा चित्रपट एप्रिल 2019 मध्ये रिलीज होणार असल्याचे समजते. हॉलिवूडच्या सुप्रसिद्ध मार्व्हल स्टुडिओची बहुचर्चित फिल्म सीरिज ‘अॅव्हेंजर्स’ जगभरातील सिनेप्रेमींची आवडती सीरिज आहे. आत्तापर्यंत आलेल्या या सीरिजच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धमाकेदार कमाई केली.