Abhinay Berde Starrer 'Ashi Hi Ashiqui' चा Teaser थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनय बेर्डे (फोटो सौजन्य- ट्विटर)

मराठी चित्रपटातील नवोदित कलाकार अभिनय बेर्डे (Abhinay Berde) लवकरच त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे यंदाच्या ख्रिसमसच्या संध्याकाळी एक नाही तर दोन सरप्राईज मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहे.अभिनेता अभिनय बेर्डे हा त्याचा आगामी चित्रपट 'अशी ही आशिकी' (Ashi Hi Ashiqui) या चित्रपटातून झळकणार आहे.  अभिनयचा हा आगामी चित्रपटही प्रेमसंबंधावर आधारित आहे. तर टी-सिरिज, मुव्हिंग पिक्चर आणि सुप्रिया पिळगावकर प्रोडक्शन तर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच मराठी अभिनेता सचिन पिळगावकर यांचा हा चित्रपट असणार आहे.

येत्या व्हेलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी,2019 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेमीयुगलुकांसाठी ही अनोखी प्रेमकहाणी काय सांगून जाणार हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.