ऐश्वर्या राय-बच्चन बनणार हॉलिवूड अभिनेत्री अँजलिना जोलीचा नवा आवाज
Aishwariya Rai Bachchan,Angelina Jolie (Photo Credits: Facebook)

आजवर हॉलिवूड सिनेमांसाठी अनेक भारतीय कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. आता याच यादीत आणखी एक नाव जोडलं जाणारं नाव म्हणजे बॉलीवूडची ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय-बच्चन.

'मॅलेफिसन्ट - मिस्ट्रेस ऑफ एव्हील' या नव्या हॉलिवूडपटात ऐश्वर्या जगप्रसिद्ध अभिनेत्री अँजलिना जोली हिच्या भूमिकेसाठी आपला आवाज देणार आहे.

ऐश्वर्याच्याच्या नावाची निवड कशी झाली याविषयी सांगताना डिस्ने इंडियाकडून सांगण्यात आले की, 'मॅलेफिसन्ट - मिस्ट्रेस ऑफ एव्हील' या हॉलिवूडपटात अँजलिनाच्या भूमिकेने जगभरातील प्रेक्षकांच्या मन जिंकले आहे. आणि या विशेष भूमिकेसाठी हिंदी आवाज देणाऱ्या तोडीसतोड कलाकाराच्या आम्ही शोधात होतो. आणि ऐश्वर्या राय बच्चनशिवाय अधिक योग्य पर्याय अजून कोणी असूच शकत नाही या मतावर आम्ही पोहोचलो.'

अँजलिना या हॉलिवूडपटात खलनायिकेची भूमिका साकारत आहे. या पात्राला ऐश्वर्यानं आवाज दिलाय खरा पण ती मोठ्या पडद्यावरसुद्धा लवकरच खलनायिकेचं पात्र साकारणार आहे.

दिग्दर्शक मणीरत्नम यांच्या आगामी सिनेमात ती हे पात्र साकारणार असल्याचं सांगण्यात येतंय.