Deepika - Ranveer Honeymoon : नववर्षाच्या निमित्ताने दीपिका आणि रणवीर हनिमूनसाठी रवाना; पहा फोटोज
रणवीर आणि दीपिका (Photo credit : Instagram)

2018 मधील सर्वात चर्चित लग्न ठरले ते दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांचे. इटली येथे हे जोडपे लग्नबंधनात अडकले. त्यानंतर मुंबई आणि बंगळूरू येथे मोठ्या थाटामाटात रिसेप्शन सोहळेही पार पडले. रणवीरचा बहुप्रतीक्षित सिंबादेखील याच महिन्यात प्रदर्शित होणार होता. बिझी शेड्युलमुळे या जोडप्याला एकत्र निवांत वेळ व्यतीत करता आला नाही. मात्र अखेर हे जोडपे नववर्षानिमित्त आपल्या हनिमूनसाठी रवाना झाले आहे. शनिवारी मुंबई विमानतळावर दीपिका आणि रणवीरचे दर्शन घडले. लग्नानंतर दीड महिन्यांना हे कपल आपला हनिमून साजरा करेल.

काल रात्री एयरपोर्टवर दीपिका आणि रणवीर ब्लॅक कलरच्या कपड्यात दिसून आले. रणवीरने ब्लॅक पॅंट, प्लेन टी-शर्ट आणि बाइकर लेदर जॅकेट परिधान केला होता.तर दीपिकानेही ब्लॅक स्कर्ट आणि जॅकेट परिधान केला होता. नेहमीप्रमाणेच आताही या दोघ्यांच्या स्टाईलची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगली आहे. (हेही वाचा : हनिमूनसाठी या ब्रिटीश जोडप्याने भारतात बुक केली अख्खी ट्रेन)

रणवीर आणि दीपिका यांचे चाहते फक्त भारतातच नाहीत, तर परदेशातही आहेत. त्यामुळे लग्नानंतर दोघांनाही विविध देशांच्या पर्यटन मंडळांकडून पेड हनीमून ट्रीप पॅकेजेस ऑफर करण्यात आले होते. यात स्वित्झर्लंड पर्यटन मंडळ आघाडीवर होते. कारण रणवीर सिंह हा स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहे.