
Mumbai News: अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या घरातून 6 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या पती शार्दुल सिंग बायसच्या कार चालकाने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. चालक रत्नेश झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रा पश्चिम येथील अरेटो बिल्डिंगच्या 23व्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाली. (हेही वाचा- Actor Rakesh Bedi यांची 85 हजारांची फसवणूक; लष्करी अधिकारी असल्याचं सांगत घातला गंडा)
पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याने जडवलेली अंगठी चोरीला गेल्याचे सांगितले. शार्दुल हे दाहिने बाहेर जाताना घातले होते. आणि घरी परतल्यावर त्यांनी ते घरातील नोकर सुमित कुमार सोंलकी यांच्याकडे सोपवले. त्यांनी ते दागिने घराच्या कपाटा ठेवले. घटनेच्या दिवशी शार्दुल याला बाहेर जायचे होते त्यावेळी तयारीत असताना कपाट उघडले तर दागिने नव्हते. त्यानंतर घरात तपास केला तेथे दागिने सापडले नाही.घरातील सर्व नोकरांकडे चौकशी करूनही हरवलेले दागिने सापडले नाही त्यामुळे सोलंकी घरात नव्हते. त्यांना फोन केा असता ते कुलाबा येथे नातेवाईकांच्या घरी आहे अशी माहिती दिली.
सोलंकीला हरवलेल्या दागिन्यांची विचारपूस केली. त्यांनी दागिने कपाटात ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर बायस यांनी सोलंकीला घरी येणास सांगितले आणि त्याने घरी येण्यास उशिर केला त्यामुळे संशय वाढू लागला. दरम्यान बायस यांच्या चालकांनी या प्रकरणी वांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी नोकराला अटक केले. परंतु अद्याप दागिने मिळाले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.