अभिनेता Vidyut Jammwal चे मोठे यश; रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्यासोबत 'या' यादीमध्ये झळकले नाव, ठरला पहिला भारतीय
Vidyut Jammwal (Photo Cedits: YouTube)

अभिनेता विद्युत जामवाल  (Vidyut Jammwal) जो आपल्या धमाकेदार साहसी कृत्यांनी देशभरातील लोकांच्या हृदयावर राज्य करतो. आता त्याने एक नवीन यश संपादन केले आहे. विद्युतने आता असे कृत्य केले आहे की, ज्यामुळे संपूर्ण देशाला त्याच्याबद्दल अभिमान वाटत आहे. TheRichest या पोर्टलने विद्युतचे नाव आपल्या '10 People You Don't Want To Mess With' यादीमध्ये समाविष्ट केले आहे. या यादीमध्ये जगभरातील अशा धाडसी लोकांची नावे समाविष्ट आहेत, ज्यांच्या सोबत सहसा कोणी पंगा घेत नाही. ही बातमी समोर आल्यापासून ट्विटरवर #VidyutJammwal ट्रेंड होत आहे.

या यादीमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ शोचा होस्ट Bear Grylls यांचीही नावे समाविष्ट आहेत. यावरून अनुमान लावू शकता की, या भारतीय अभिनेत्याने किती मोठी कामगिरी केली आहे. अभिनेता विद्युत बॉडी डबलचा वापर न करता अतिशय धोकादायक, साहसी सिन्स आणि स्टंटसाठी ओळखला जातो. ज्यामुळे त्याचे नावही या यादीत समाविष्ट झाले आहे. विद्युत हा पहिला भारतीय आहे, ज्याचे नाव या यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे.

यापूर्वी, 2018 मध्ये विद्युत जामवालने लूपरच्या (Looper) पहिल्या 6 मार्शल आर्टीस्टच्या यादीमध्ये स्थान मिळविले होते आणि जॅकी चॅन आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विजेतेपद जिंकले होते. लॉकडाऊन दरम्यान, विद्युतने सोशल मिडीयावर आपल्या व्यायामाचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहे. लोकांनी व्व्यायामाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावे यासाठी विद्युत नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. (हेही वाचा: Suicide or Murder सिनेमात सुशांत सिंह राजपूत सारखा दिसणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी साकारणार प्रमुख भूमिका (Check First Look))

दरम्यान, विद्युत जामवाल अ‍ॅक्शन चित्रपटातील उत्तम भूमिकांसाठी ओळखला जातो. तो एक स्टंट कलाकार आणि प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट देखील आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याने भारतीय मार्शल आर्ट कलारीपायट्टूचे प्रशिक्षण घेतले आहे. हिंदी चित्रपटांशिवाय तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.