
सध्या मराठी कलाकारांच्या रिअल लाईफ विवाहबंधनात अडकण्याच्या यादीमध्ये अभिनेता संग्राम समेळ (Sangram Samel) याचं देखील नाव जोडलं गेले आहे. संग्राम समेळ हा डान्सर श्रद्धा फाटक (Shradha Phatak) सोबत विवाहबंधनात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी संग्राम आणि श्रद्धा ही जोडी इचलकरंजी मध्ये विवाहबंधनात अडकली. कुटुंबिय आणि मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये ही जोडी लग्नाच्या बेडीमध्ये अडकली आहे. सध्या संग्राम-श्रद्धा यांच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडीयामध्ये झपाट्याने शेअर केले जात आहेत.
संग्रामचे हे दुसरे लग्न आहे. संग्राम 2016 साली रूंजी फेम अभिनेत्री पल्लवी पाटील सोबत विवाहबद्ध झाला होता. हे दोघेही जुने मित्र होते पण त्यांच्या विवाहानंतर काही बिनसल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता संग्राम समेळ श्रद्धा फाटक सोबत विवाहबद्ध झाला आहे.
संग्राम-श्रद्धाच्या लग्नाचे फोटोज
View this post on Instagram
संग्राम समेळ हा मराठी अभिनेते अशोक समेळ यांचा मुलगा आहे. संग्रामची आई संजीवनी समेळ या देखील कलाक्षेत्रात काम करतात. दरम्यान संग्राम समेळ नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रातून रसिकांच्या भेटीला आला आहे. 'पुढचं पाऊल', 'सुखांच्या सरीने हे मन बावरे' तसेच विक्की वेलिंगकर, ‘स्वीटी सातारकर’, ‘ब्रेव हार्ट' या कलाकृतींमधून रसिकांच्या भेटीला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘सुखांच्या सरींचे हे मन बावरे’ या मालिकेच्या निर्मात्याने मानधन थकवल्या प्रकरणी या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर चालवलेल्या मोहिमेमध्येही संग्राम सहभागी होता. त्यानेदेखील यामध्ये सहभाग घेत पैसे वेळेवर मिळाले पाहिजे यासाठी आग्रही मागणी धरत आपली मतं व्यक्त केली होती.