भारतातील दुचाकीचे मार्केट झपाट्याने वाढत आहे. ट्राफिकच्या समस्येला कंटाळलेले मोठ्या शहरातील लोक सध्या चारचाकी ऐवजी दुचाकीला प्राधान्य देताना दिसत आहेत. अशावेळी लोकांची पसंती साहजिकच काही क्रेझी बाइक्सना असते, अशाच क्रेझी बाईक मधील एक नाव म्हणजे क्रुझर स्टाईलच्या मोटरसायकल. अगदी लाखाच्या घरात किमती असलेल्या या बाईक्स खिशाला परवडतील अशा भावात देखील उपलब्ध आहेत. चला तर पाहूया आशा कोणत्या क्रुझर बाइक्स आहेत ज्या सामान्य व्यक्तीदेखील खरेदी करू शकेल.
१) बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट १८० ही भारतातील सामान्य व्यक्तीला परवडणारी आणि म्हणूनच सर्वात जास्त विकली जाणारी क्रुझर आहे. मुंबई एक्स-शोरूममध्ये या बाईकची किंमत ८५, ६१३ इतकी आहे. या क्रुझर बाईकमध्ये अॅल्युमिनियम फिनिशिंगयुक्त मेटल ब्लॅक अलॉय व्हील आहे. यासोबतच बाईकमध्ये ट्यूबलेस टायर दिले आहे. म्हणजे कच्चे आणि डोंगरी अशा दोन्ही रस्त्यांवर तुम्ही याचा आनंद घेऊ शकाल.
२) बजाजचीच दुसरी परवडणारी क्रुझर आहे अॅव्हेंजर क्रुझ २२०. या बाईकमध्ये क्रोमचा वापर करण्यात आला आहे. तसेच समोर मोठी विंडस्क्रीन दिलेली आहे. स्पोक वील, क्रोमयुक्त आरसे असलेल्या या बाईकची किंमत ९४,७०७ इतकी आहे. हायवेवर चालवण्यासाठी ही २ चाकांची मर्सिडीझ आहे, मात्र खड्डे असणाऱ्या रोडवर या बाईकच्या काही समस्या उदभवू शकतात.
३) सुझुकीची इंट्रुडर ही बाईक भारतात नुकतीच लाँच झालेली आहे. फार कमी कालावधीमध्येच या बाईकने लोकांची मनेदेखील जिंकली आहेत. या बाईकची किंमत १ लाख २ हजार रुपये आहे. तर फ्युअल इंजेक्टर असलेल्या मॉडेलची किंमत जास्त आहे. Suzuki Intruder मध्ये १५४.९ ccचं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन १४.८Ps ची पावर आणि १४Nm चं टार्क जनरेट करतं. या इंजिनमध्ये ५ स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. तसेच मोठी फ्यूअल टँक, प्रोजेक्टर हेडलॅम्पस, आरामदायक रायडिंग पोझिशन आणि पाठीमागे एलईडी टेललाईट्स देण्यात आले आहेत.
४) भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बुलेटलाही या क्रुझर श्रेणीमध्ये समाविष्ट करू शकता. क्लासिक ३५० हे मॉडेलतर भारतातील लोकांच्या काळजावर कित्येक वर्षे राज्य करीत आहे. या बाईकची किंमत १ लाख १६ हजार रुपयांपासून सुरु होते.
५) रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० मुळेच कंपनीची ग्रोथ होऊन, कंपनी मार्केटमध्ये आपले नाव टिकवून आहे. स्टाईल आणि ब्रँड व्हॅल्यूसाठी लोकप्रिय असणाऱ्या या बाईकची किंमत आहे १,३९,0३९