मॉडेल 3 कारसह, 7.10 कोटी रुपये जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल एक काम
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

इलेक्ट्रॉनिक कारच्या विश्वात क्रांती घडवणारी कार कंपनी म्हणून टेस्ला (Tesla) मोटर्सकडे पहिले जाते. आपल्या कार दोषविरहीत असाव्यात यासाठी कंपनीने एक स्पर्धा आयोजित केली आहे. जो कोण आपल्या मॉडेल 3 या कारची सुरक्षा प्रणाली हॅक करून दाखवेल त्याला कंपनी 1 दशलक्ष डॉलर म्हणजेच 7.10 कोटी रुपये बक्षिस म्हणून देणार आहे. शिवाय ही नवी कोरी गाडीदेखील त्या व्यक्तीला भेट म्हणून मिळणार आहे. टेस्लाच्या कॅनडातील वानकोवर येथील मुख्यालयामध्ये Pwn2Own 2019 च्या तीन दिवसीय सायबर सिक्युरिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये मॉडेल 3 ही कार ठेवण्यात आली होती.

Pwn2Own ही एक संगणक हॅकिंग स्पर्धा आहे. याची सुरुवात 2007 सालापासून झाली. या स्पर्धेमध्ये सॉफ्टवेअर, संगणक, इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टी हॅक करण्याचे चॅलेंज दिले जाते. जो कोणी या गोष्टी हॅक करेल त्याला त्या वस्तू आणि रोख रक्कम परितोषिक म्हणून दिले जाते. Pwn2Own सिक्युरिटी कॉन्फरंसने इलेक्ट्रॉनिक कार बनवण्याऱ्या कंपनीशी टायअप केले आहे. ज्यामध्ये मॉडेल 3 मधील कमतरता शोधून काढणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जाणार आहे. जिंकणाऱ्याला कंपनीच्या वेबसाईवरही जागा दिली जाणार असून टेस्ला सिक्योरिटी रिसर्चर हॉल ऑफ फेम मध्ये त्याचा फोटो झळकणार आहे.