Diwali Offers:  TATA कार्सवर बंपर ऑफर, सोबत iPhone X जिंकण्याची संधी
टाटा मोटार्स (Photo Credit: Tata Motors Twitter)

दिवाळीच्या दिवसात शुभ मुहूर्तावर अनेकजण सोनं, घर किंवा गाडी अशा मौल्यवान वस्तू विकत घेतात. यंदाच्या दिवाळीत तुम्हीही नवी कार विकत घेण्याचा प्लॅन करत असाल ? तर टाटाच्या कार्सवर यंदा बंपर ऑफर जाहीर करण्यात आली आहे. सोबतच तुम्हांला अ‍ॅप्पल स्मार्टफोन जिंकण्याचीही संधी मिळणार आहे.

मोफत मिळणार iPhone X

टाटाच्या हेक्सा, नेक्सन, टिगोर, टियागो आणि जेस्ट या कार्सवर बंपर ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये 98 हजारांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी iPhone X या खास गिफ्टचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. टाटा हेक्सा बुक करणार्‍यांनाच iPhone X जिंकण्याची संधी आहे.

कशी आहे टाटा हेक्सा कार ?

टाटा हेक्सा कारची किंमत सुमारे 12 लाख 57 हजार रूपये आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये या कारवर 98 हजारांची सूट देण्यात आली आहे. या कारवर आयफोन जिंकण्याची संधी आहे. मात्र तुम्ही आयफोन सोडून रक्कमेच्या स्वरूपात पूर्ण सूट मिळवू शकता.

SUV सेगमेंटमधील स्वस्त कार

टाटा हेक्सा 7 सीटर एसयुव्ही कार आहे. इतर एसयुव्ही कारच्या तुलनेत ती स्वस्त आहे. पॉवरफूल आणि दमदार कारच्या सोबतच हेक्सा कारचा लूक उत्तम आहे. या कारला बाजारात महिंद्रा XUV 50आणि टोयोटा इनोवा क्रिस्टाची टक्कर आहे.

टाटाच्या खास ऑफर्स

टाटाच्या गाड्यांवर कॅश डिस्काऊंट जाहीर करण्यात आलं आहे. सोबतच दागिन्यांच्या वाऊचर्सपासून एलईडी टीव्ही ग्राहकांना मिळणार आहे. तुम्हांला गिफ्टच्या स्वरूपात काय पाहिजे हे पर्यायांमधून निवडण्याची संधीदेखील ग्राहकांना मिळणार आहे.

कोणत्या कारवर किती सूट ?

टाटा टिगोर 73000 रुपये

टाटा नेक्सन 57000 रुपये

टाटा टियागो 40000 रुपये

टाटा हेक्सा 98000 रुपये

टाटा स्टॉर्म 87000 रुपये

टाटा जेस्ट 83000 रुपये

मग यंदा दिवाळीचा मुहूर्त साधत ही ऑफर एन्कॅश करा आणि तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण करा..

टाटा सोबतच दिवाळीत मारूती आणि ह्यूंडाईनेही ऑफर जाहीर केली आहे.