रॉयल एन्फिल्ड (Royal Enfield) Shotgun 650 विक्रसाठी नुकतीच लाँच केली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Shotgun 650 चे Motorverse Edition सादर केले होते. जे फक्त लिमिटेड एडिशन होते. त्यानंतर कंपनीने आता रेग्युलर व्हर्जन लाँच केले आहे. रॉयल एन्फिल्ड कंपनी साहसी बाईकसाठी ओळखली जाते. कंपनी नेहमीच नवनवीन बाईक लाँच करत असतात. ( हेही वाचा  - 2024 Bajaj Chetak Electric Launched In India: भारतात लॉन्च झाली 2024 बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)

रॉयल एन्फिलडच्या या नवीन बाईकची किंमत 3.59 लाख ते 3.73 लाख रुपये आहे. कंपनीची ही नवीन बाईक अनेक आधुनिक फिचर्स आणि आकर्षक लूकसह लाँच केली आहे. कंपनीची ही नवीन बाईक 660cc प्लॅटफॉर्मवर तयार केलेली चौथी बाईक आहे. ही नवीन शॉटगन बाइक पोर्टफोलिओमध्ये Interceptor 650, Continental GT 650 आणि Super Meteor 650 लाईन-अपमध्ये समाविष्ट झाली आहे

Shotgun 650 मध्ये पॅरलल-ट्विन 648cc इंजिन देण्यात आले आहेत. हे इंजिन 47hpची पॉवर आणि 52.3Nm टॉर्क जनरेट करते. यात समोर 320mm डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात 30mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.