फॅन्सी नंबरप्लेट आढळल्यास आता  RTO ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करू शकते; मुंबई ट्राफिक पोलिसांचे आदेश
Mumbai Traffic Police. Representative Image. (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये आता फॅन्सी पद्धतीने कार किंवा मोटारसायकलचा नंबर लिहणं महागात पडण्याची शक्यता आहे. नुकत्याच मुंबईत सार्‍या आरटीओंना (RTO) फॅन्सी नंबरप्लेट (Fancy Number Plates धारकांना समज दिल्यानंतरही बदल न झाल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश (Mumbai Traffic Police) देण्यात आले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जानेवारी ते ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत सुमारे 2000 वाहनचालकांना ई चलन पाठवण्यात आलं आहे. या चालकांचे नंबर प्लेट्स देवनागरीमध्ये किंवा काहीशा फॅन्सी अंदाजामध्ये आहेत.

फॅन्सी नंबरप्लेट वापरल्यास वाहनधारकाला सुमारे 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येतो. यामध्ये राजकीय मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिक समावेश आहे. 2018 मध्ये सुमारे 9000 दुचाकीस्वारांचे परवाने रद्द करण्याच आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते त्रिवणकुमार कर्नानी यांनी TOI शी बोलताना दिली आहे. हजारो रुपयांच्या वाहतूक चलान पासून वाचण्यासाठी वापरा 'हा' मार्ग

एका वाहतूक पोलिसाने नंबरप्लेट्सच्या बाबतीमध्ये सार्‍या राज्यात एकाच प्रकारचा नियम असावा असं मत व्यक्त केलं आहे. अनेकदा इतर भाषिक नंबरप्लेट वाचायला वेळ लागतो किंवा ती चटकन समजणं शक्य नसतं. ती गाडी गुन्ह्यात सहभागी असेल तर त्यावर कारवाई करताना अडचण येऊ शकतो. त्यामुळे देशभर इंग्रजी भाषेतच नंबरप्लेट असावी.