Maruti Swift पूर्वीपेक्षा असणार अधिक दमदार, जाणून घ्या कोणत्या नव्या फिचर्ससह होऊ शकते लॉन्च
(Photo Credits: Facebook)

मारुती सुजुकीने नुकतीच आपली 2021 Maruti Suzuki Swift लॉन्च केली होती. याचे डिझाइन आणि अपडेटेड फिचर्स ग्राहकांना अत्यंत पसंद आले होते. मात्र आता कंपनीने पुन्हा एकदा या कारचे नेक्स्ट जेनरेशन मॉडेल लॉन्च करण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. या मॉडेलसाठी सर्व अपडेट फिचर्स देत ती मार्केटमध्ये उतरवली जाणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हे मॉडेल टेस्टिंग दरम्यान, स्पॉट करण्यात आले होते. तर जाणून घ्या या कारच्या खासियत बद्दल अधिक माहिती.(Isuzu D-Max V-Cross चे BS6 मॉडेल भारतात लॉन्च, जाणून ऑफर्ससह खासियत)

नेक्स्ट जनरेशन Maruti Swift ही हर्टेक्ट प्लॅटफॉर्म वर तयार केली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर आधी कंपनीने सुजुकी एस-प्रेसो तयार करण्यासाठी केला होता. या प्लॅटफॉर्मची सर्वाधिक मोठी खासियत अशी की, याचे वजन अत्यंत कमी असणार आहे. त्याचसोबत हँडलिंग सुद्दा अत्यंत सोप्पे होऊन जाते. ऐवढेच नव्हे तर या प्लॅटफॉर्मच्या कारणामुळे मायलेज अत्यंत अधिक वाढते. अशातच ग्राहकांना नेक्स्ट जेनरेशन स्विफ्ट चालवताना उत्तम अनुभव मिळणार आहे.

कारच्या लुक बद्दल बोलायचे झाल्यास या प्रीमियम हॅचबॅकच्या लुक आणि डिझाइनमध्ये मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. याचे डिझाइन अत्यंत वेगळे असणार आहे. त्यामुळे ती अधिक स्पोर्टी लूकमध्ये दिसणार आहे. MARUTI SWIFT 2022 च्या एक्सटीरियरमध्ये ग्राहकांना मोठे रेडियेटर ग्रिल, पूर्णपणे डिझाइन करण्यात आलेले हेडलॅम्प आणि फ्रंट बंम्पर दिले जाणार आहे. कारमध्ये नव्या अलॉय व्हिल्सचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना शोल्डर क्रिजेज आणि नवे ORVMs दिले जाणार आहे. याचे टेल लॅम्प्स सुद्धा रिवाइज केले जाणार आहे.(Nissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सध्याच्या स्विफ्टच्या इंजिनलाच नेक्स्ट जेनरेशन स्विफ्टचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये 1.2 लीटरची क्षमता अलेले K12 डुअलजेट इंजिन दिले गेले आहे. जो 89bhp ची मॅक्सिमम पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याचसोबत कारमध्ये 48V चे माइल्ड हायब्रिड सिस्टिमचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कारचे मायलेज अधिक वाढले जाणार आहे.