सदोष कार विकल्याप्रकरणी मारुती सुझूकी कार कंपनीला दंड(Photo Credits: Twitter)

एका ग्राहकाच्या तक्रारीवरून मारुती सुझूकी आणि तिच्या एका डिलरला ग्राहकाला सदोष कार विकल्याप्रकरणी लाखभर रूपयांचा दंड भरायला भाग पडलं आहे. The National Consumer Disputes Redressal Commission (NCDRC)ने मारुती सुझूकी कार कंपनी आणि कार डिलर चौघुले इंडस्ट्रिजला ग्राहकांना संबंधित भूर्दंड भरायला भाग पाडले आहे.

गोव्यामधील शिवानंद हरापनहल्ली या ग्राहकाला 45 दिवसांमध्ये सदोष कार विकल्याप्रकरणी दंड भरायला भाग पाडले आहे. शिवानंद यांना विकण्यात आलेली कार सदोष होती. या कारच्या क्लचमध्ये दोष होता. सुरूवातीपासूनच यामध्ये दोष होता. ग्राहकाच्या तक्रारीनंतर सर्व्हिंसिंग दरम्यान क्लच बदलण्यात आला. त्यानंतर तो बदलण्यात आला. मात्र कार चालतना त्रास कायम होत असल्याने ग्राहकाने कंपनीकडे तक्रार केली होती.

नवीन कार विकत घेऊन देखील ग्राहकाला त्याचा फायदा मिळत नव्हता त्यामुळे कंपनीला या प्रकरणी दंड भरावा लागला आहे. 2005 साली शिवानंद यांनी मारुती स्विफ्ट ZXI कार विकत घेतली. मात्र सुरूवातीपासूनच कारमध्ये दोष होता.

शिवानंद यांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित कारची तपासणी करण्यात आली. कार कंपनी दोषी असल्याचं आढळल्यानंतर संबंधिता 2.44 लाखांपेक्षा अधिक रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र स्टेट कमिशनने याप्रकारणी निम्मा दंड कमी करून तो लाखभर केला आहे. यामध्ये सदोष कार विकल्याप्रकरणी दंड सोबतच ग्राहकाला झालेला मानसिक त्रासाचीही भरपाई देण्यात आली आहे.