मारूती सुझुकीच्या गाड्यांवर बंपर ऑफर ! 1.85 लाख रूपयांचा फायदा
मारूती स्विफ्ट File Photo

पितृपक्ष पंधरवडा संपल्यानंतर नवरात्र, दिवाळी आणि न्यू इयर अशा सेलिब्रेशनचा काळ सुरू होतो. सणांची रेलचेल असणारा हा तीन महिन्यांचा काळ एन कॅश करण्यासाठी मारुती सुझूकीने खास ऑफर जाहीर केली आहे. दसरा -दिवाळीच्या तोंडावर तुम्ही नवी कार विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर मारुती सुझुकीकडून देण्यात येणारी डिस्काऊंट नक्की जाणून घ्या.

मारूती सुझुकीचं डिस्काऊंट

मारुती सुझूकीच्या वॅगन आर गाडीवर सर्वाधिक डिस्काऊंट जाहीर करण्यात आलं आहे. तर सर्वात कमी बलेनो कारवर मिळणार आहे.बलेनोवर केवळ दहा हजारांचा कॅश बॅक आहे. मात्र वॅगन आर वर 1.85 लाखांची सूट मिळणार आहे. कॉरपरेट्स मारूती डिलर्सनाही 15,000 रूपयांचा अधिक डिस्काऊंट मिळणार आहे

मारूतीच्या कोणत्या गाडीवर किती डिस्काऊंट

  • मारूती ऑल्टो 800 गाडीवर 40,000 डिस्काऊंट आणि 50,000 एक्स्चेंज बोनस
  • ऑल्टो K10 मॉडेलवर 50,000 चा डिस्काऊंट आणि 65,000 एक्स्चेंज बोनस

  • सेलेरियोवर 95,000 कॅश डिस्काऊंट आणि 40,000 एक्सचेंज बोनस

  • मारुती डिझायरवर 40,000 रूपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 50,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस

  • बलेनोवर 10,000 रूपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 20,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस

  • मारूती स्विफ्टवर 30,000 रूपयांचा कॅशबॅक आणि 35,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे.