अनेकांचे आपल्या पहिल्या गाडीचे स्वप्न पूर्ण करणारी म्हणून मारुती सुझुकीच्या आल्टो (Maruti Alto) कडे पहिले जाते. सध्या कार विकत घेणाऱ्यांचे वाढते प्रमाण पाहून, बाजारात अनेक नव्या गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र आजही आल्टोचे स्थान अबाधित आहे. 1 एप्रिल 2020 पासून देशात क्रेश टेस्ट अनुरूप गाड्यांची निर्मिती बंधनकारक होणार आहे. त्यामुळेच आल्टो 800 गाडीला नवा लूक देण्यात येत आहे. आता नव्या स्वरुपातातील आल्टो ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार येत्या दिवाळीमध्ये मारुती सुझुकीकडून नव्या रुपातील गाडी बाजारात सादर केली जाईल. चला तर पाहूया कशी असेल ही नवी आल्टो
कंपनीने या कारला गतवर्षीच्या ऑटो एक्सपोमध्ये सादर केले होते. ही कार दिसण्यात SUV सारखी आहे, मिनी SUV असे या नव्या लूकचे वैशिष्ट्य असेल. या कारचे डिझाइन आरएंडडी डीमने तयार केले आहे. या कारच्या बाहेरील आणि आतील भागासाठी नव्याने इंटेरियर करण्यात आले आहे. म्हणजेच या नव्या कराला अगदी मोडर्न लूक देण्यात आला आहे. या कारमध्ये अनेक अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत, यामुळे ही कार चालवणे आता आणखी सुरक्षित होणार आहे. (हेही वाचा : नव्या Maruti WagonR कारचं लॉन्चपूर्वीच बुकिंग सुरू, अवघ्या 11,000 रूपयांमध्ये करू शकाल बुकिंग, पहा दमदार फीचर्स आणि किंमत)
कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, स्टीयरींग मांउटेड कंट्रोलसारखे फिचर्स आहे. या कारची टक्कर ह्युंदाई सेंट्रो, रेनाँ क्विड, टाटा टियागोशी असणार आहे. कंपनीने या नवीन कारचे इंजिन अपडेट केले आहे. परंतू याविषयी कंपनीकडून अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. 2017 मध्ये अल्टोचे 2.57 युनिट्स विकले गेले होते, तर 2018 मध्ये 2.56 युनिट्सची विक्री झाली आहे. ही आकडेवारी पाहता अल्टोची लोकप्रियता अजूनही टिकून आहे हे लक्षात येते. त्यामुळे आता हे नवे मॉडेल काय कमाल दाखवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.