Kawasaki ने भारतात उतरवल्या दोन दमदार बाइक्स, किंमत 21.9 लाखांपासून सुरु
_Kawasaki (Photo Credits-Twitter)

कावासकी इंडियाने भारतात आपली प्रमुख सुपरचार्ज्ड नेक्स मोटरसायकल मधील Z H2 आणि ZH2SE लॉन्च केली होती. अत्यंत आकर्षक लूक आणि दमदार इंजिन लैस असलेल्या या बाइकची किंमत 21.9 लाख रुपयांपर्यंत ठरवण्यात आली आहे. जी Z H2 मॉडेलची आहे. याच्या Z H2SE मॉडेलची किंमत 25.9 लाख रुपये असणार आहे. येथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे दोन्ही बाइक्स या एकाच रंगात उतरवण्यात आल्या आहेत. लॉन्च करण्यात आलेल्या दोन नव्या बाइक कावासकी Z बाइक दुर्लभ उत्पादनामधील असून Kawasaki River Mark च्या विशेषतेपेक्षा लैस आहे. यासाठीच असे सांगितले जात आहे की, कंपनीची हा लोगो फक्त ऐतिहासिक मॉडेल पर्यंत सीमित आहे. आता Z मॉडेल सुद्धा अशाच पद्धतीने उतरवण्यात आली आहे.

2021 कावासकी Z H2आणि Z H2 SE वर एक सुपरचार्ज, लिक्विड-कूल्ड 998cc डीओएचसी 16 वॉल्व इंजिनचा वापर केला आहे. जी 198 bhp ची अधिक पॉवर देण्यास सक्षम आहे. तर कंपनी इनटेक आणि एग्जॉस्ट विशेषतेसह बाइकमध्ये एफआय सेटिंग्स ही सुनिश्चित करते.(Honda च्या नव्या क्रुजर बाईकसाठी Down Payment शिवाय घरी आणता येणार, कंपनीकडून EMI चा ऑप्शन उपलब्ध)

जाहीर करण्यात आलेली किंमत अधिक असल्याने यामध्ये काही खास फिचर्स ही दिले गेले आहेत. याच्या फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये ऑल-एलईडी लाइटिंग, इंस्ट्रुमेंट क्लस्टरसाठी 4.3 इंचाचा टीएफटी कलर स्क्रिन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून RIDEOLOGY अॅपचा समावेश आहे. नव्या कावासकी Z H2 आणि Z H2SE मध्ये रायडरसाठी इलेक्ट्रॉनिक अॅड्स ही मिळणार आहे. ज्यामध्ये कावासकी ट्रॅक्शन कंट्रोल, कावासकी कॉर्नरिंग मॅनेजमेंट फंक्शन, कावासकी इंटेलिजेंट एन्टी लॉक ब्रेक सिस्टिम, कावासकी लॉन्च कंट्रोल मोड, क्विट शिफ्टर, इलेक्ट्रॉनिक क्रुज कंट्रोल सारख्या बाइक मोड्सह पॉवर मोड ही निवडता येणार आहेत.