भारतात सर्वाधिक फास्ट इलेक्ट्रिक बाइक लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 150km
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PixaBay)

Kabira New Electric Bike Launched: भारतात सातत्याने इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये स्टार्टअप कंपन्यांचे स्वागत केले जात आहे. नुकत्याच आणखी एक स्टार्ट अप कंपनी कबीरा मोबिलिटी यांनी आपल्या दोन नव्या इलेक्ट्रिक KM3000 आणि KM4000 लॉन्च केली आहे. ज्याची किंमत क्रमश: 1,26,990 रुपये आणि 1,36,900 रुपये ठरण्यात आली आहे. तर KM3000 ही एक स्पोर्ट्स बाइक असून KM4000 ही एक स्ट्रिट फायटर आहे. ज्या दोन्ही पद्धतीने भारतात तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही नव्या इलेक्ट्रिक बाइक्समध्ये तीन रायडिंग मोड्स दिले गेले आहेत. ज्यामध्ये इको, राइड आणि स्पोर्ट्स याचा समावेश आहे.

KM300 मध्ये DeltaEV म्हणून ओळखली जाणारी 350 W BLDC हब मोटर आणि 4.0kWh च्या आयन बॅटरीचा वापर केला गेला आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही बाइक 100 किमी/ताशी वेगाच्या टॉप स्पीड लैस आहे, यामध्ये दिल्या गेलेल्या इको मोडच्या माध्यमातून सिंगल चार्जमध्ये 120 किमी पर्यंत रेंज देण्यास सक्षम असणार आहे. चार्जिंग बद्दल बोलायचे झाल्यास या बाइक्स पूर्णपणे चार्ज होण्यास 6 तास 30 मिनिटे लागतात. तर बूस्ट मोडवर फक्त 50 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग करता येणार आहे.(Volkswagen Polo आणि Vento चे भारतात लॉन्च झाले टर्बो मॉडेल, किंमत 6.99 लाखांपासून सुरु)

तर KM4000 एक DeltaEV 5000 BLDC हब मोटर आणि 4.4 kWh च्या आयन बॅटरी लैस आहे. जो एकूण 120 किमी/ताशी वेगाची टॉप स्पीड पकडते. त्याचसोबत ही बाइक इको मोडवर 150 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. या ई-बाइकसाठी बुकिंग 20 फेब्रुवारी पासून कंपनीकडून सुरु केली जाणार आहे. याच्या सुरुवातीला ती दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, गोवा सारख्या काही ठिकाणी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कबीरा बाइक्सची डिलिव्हरी यंदाच्या वर्षात मे मध्ये सुरु होणार आहे.