जावा बाईक्स (Photo Credits: Twitter)

भारतामध्ये पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या जावा (Jawa Motorcycles) बाईक्स देशभरामध्ये तुफान प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन माध्यमातून सुरु करण्यात आलेली बुकिंग आता थांबवण्याचा निर्णय जावा कडून जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबर 2019 पर्यंतची बुकिंग फुल्ल झाल्याने अखेर २५ डिसेंबर म्हणजे आजच्या मध्यरात्री जावा बाईक्सची बुकिंग बंद होणार आहे. ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे.

सध्या जावा (Jawa ), जावा 42 ( Jawa 42) आणि जावा पेराक (Jawa Perak)अशा तीन बाईक्स भारतात लॉन्च केल्या आहेत. . मार्च महिन्यामध्ये जावा मोटारसायकल ग्राहकांना मिळेल तर जानेवारीमध्ये गाडीच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे. भारतामध्ये मध्यप्रदेशातील इंदौर नजीक असणार्‍या पीथमपूर भागामध्ये महिंद्रा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिटिलीद्वारा जावा बाईक्सची निर्मिती केली जाणार आहे.

बाईक्सच्या किंमती:

दी जावा – 1.64 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

जावा 42 – 1.55 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

जावा पेराक – 1.89 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

देशभरात एकूण 105 डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. पुण्यात जावाने देशातील पाहिलं आऊटलेट सुरु केलं आहे. चिंचवड आणि बाणेर मध्ये ही आउटलेट्स सुरु करण्यात आली आहेत.