Isuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती
Isuzu कार्स (Photo Credits: Twitter)

Isuzu च्या गाड्यांच्या किंमतीत कंपनी वाढ करणार असल्याने येत्या नववर्षापासून या गाड्या महागणार आहेत. जपानची कार निर्माता कंपनी इसुजू मोटर्स (Isuzu Motors) 1 जानेवारी 2019 पासून आपल्या गाड्यांच्या किंमती लाखभर रुपयांनी वाढवणार आहे. कच्चा माल आणि वितरणाच्या वाढत्या खर्चामुळे गाड्यांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. 2019 मध्ये लॉन्च होणाऱ्या शानदार कार्स

कमर्शिअल वाहनांच्या किंमती 1-2% तर लाईफस्टाईल आणि अॅडव्हेंचर पिकअप वाहनांच्या किंमती 3-4% वाढविण्यात येतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे. सध्या इसुजू कंपनी देशात अॅव्हेंचर युटिलिटी वाहनं V-Max, D-Max, V-Cross, SUV Mu-X आणि D-Max पिकअप च्या अनेक व्हर्जनची विक्री करते. नक्की वाचा: कार खरेदी करताय? मग डील करताना या गोष्टींची माहिती हवीच.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या शोरुमधील किंमती 1 जानेवारीपासून 15,000 ते एक लाखपर्यंत वाढतील. ही वाढ वेरिएंट आणि मॉडलनुसार वेगवेगळी असेल.