Hyundai ची नवीन SUV घेऊन येत आहे कारमध्ये Fingerprint टेक्नॉलॉजी यंत्रणा, जाणून घ्या कसे करणार काम
ह्युंदाई प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: hyundai.com)

आधुनिक तंत्रज्ञानच्या जोरावर दिवसेंदिवस नवीन नवीन गोष्टींचा शोध लावला जात आहे. त्याचप्रमाणे ह्युंदाई (Hyundai) ही कंपनी तिच्या नवीन कारच्या सिरिजमधील SUV मध्ये स्मार्ट फिंगरप्रिंट तंत्रज्ञान (Smart Fingerprint Technology)असलेली शानदार कार बाजारात घेऊन येत आहे. तर 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात ही कार लॉंच करण्यात येणार आहे.

ह्युंदाई  कंपनीच्या या कारमध्ये फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजीच्या आधारे वाहान चालक कारचे दरवाजेच नाही तर गाडी सुद्धा सुरु करु शकणार आहे. तर दरवाजे उघडण्यासाठी दरवाज्याला लावण्यात आलेल्या सेंन्सॉर बटणावर बोट ठेवावे लागणार आहे.

या कारच्या आतमध्ये फिंगरप्रिंट डेटासह वाहन चालक गाडीमधील सिट आपल्या सोईनुसार बदलू शकणार आहे. तसेच कारचे आरशेसुद्धा फिंगरप्रिंट टेक्नॉलजीद्वारा 360 अँगलप्रमाणे पुढे पाठी करु शकणार आहे. ह्युंदाईची ही कार सुरुवातीला काही मोजक्याच बाजारात ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.