भारतात ह्युंदाई (Hyundai) कंपनीची सॅंट्रो (Santro) कार अतिशय लोकप्रिय आहे. कंपनीने ही गाडी नव्या ढंगात सादर केल्यावर तर या गाडीची क्रेझ अजूनच वाढली. कंपनीने आधीच या कारचा 50,000 युनिट्सचा टप्पा पार केला आहे. मात्र एप्रिल महिन्यात या कारच्या विक्रीवर झालेल्या परिणामामुळे, आपल्या ग्राहकांच्या गरजा ओळखून कंपनीने मे महिन्यात या गाडीवर घसघसीत ऑफर जाहीर केली आहे. या महिन्यात तुम्ही जर सॅंट्रो विकत घेतली तर तुम्हाला तब्बल 31,000 हजारापर्यंत सूट मिळू शकतो.
11 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस अशी एकूण 31 हजाराची सूट या गाडीवर मिळत आहे. ही गाडी एकूण 9 व्हेरीएंट्समध्ये उपलब्ध आहे. यातील सात प्रकारांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आहे आणि दोन प्रकार स्वयंचलित ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध आहेत. गाडीमध्ये 17.६४ सेंटीमीटरची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. या गाडीचे नवीन सेफ्टी नॉर्म्सच्या अनुषंगाने डिझाईन बनवले आहे. ह्युंदाई सॅंट्रोची किंमत 3.90 लाख रुपये ते 5.65 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे. ही गाडी 1.1-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे चालविले जाते, जे 68bhp पॉवर आणि 99 एनएम टॉर्क तयार करते. (हेही वाचा: Bajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स)
कंपनीने ऑक्टोबर 2018 मध्ये या नवीन सॅंट्रोचे मॉडेल बाजारात आणले होते. मार्चमध्ये याच्या 8,280 युनिट्सची विक्री झाली होती, तर एप्रिलमध्ये यामध्ये थोडी घट होऊन 6,096 इतक्या युनिट्सची विक्री झाली. ह्युंदाई सॅंट्रो सात वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे- टायफून सिल्व्हर, पोलर व्हाईट, मारियाना ब्लू, फायरी रेड, डायना ग्रीन, इंपीरियल बेज आणि स्टार डस्ट. या गाडीच्या पेट्रोल व्हेरीएंट्सचे मायलेज 20.3 किलोमीटर इतके आहे तर, सीएनजी व्हेरीएंट्सचे मायलेज 30.5 किलोमीटर इतके आहे.