Honda Amaze (Photo Credits-Twitter)

भारतात आणखी एक पॉप्युलर सेडान Honda Amaze या महिन्यात नव्या अवतारात लॉन्च होणार आहे. Honda Amaze Facelift असे त्याचे नाव असून कंपनी ही कार येत्या 18 ऑगस्ट रोजी बाजारात उतरवणार आहे. त्यामुळे ज्यांना ही कार घेण्याची इच्छा आहे त्यांनी ती 5 हजार रुपये देऊन बुक करु शकता. तर रिटेल स्टोअरमध्ये तुम्ही बुकिंग करत असाल तर तेव्हा तुम्हाला 21 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. याचा उत्तम लूक आणि फिचर्स असणाऱ्या कारची गेल्या काही काळापासून प्रतीक्षा केली जात आहे.

Honda Cars India मध्ये मार्केटिंग आणि सेल्स सिनियर वाइस प्रेसिडेंट आणि डायरेक्टर राजेश गोयल यांनी असे म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांना अधिक प्रीमियम, स्टाइलिश सेडान कार होंडा अमेझ फेसलिस्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत. जी येत्या काळात सर्वांवर आपली छाप सोडणार आहे. होंडा अमेझ ही कंपनीची टॉप सेलिंग सेडान कार मानली जाते. जी दमदार फिचर्सलैस असली तरीही शिखाला परवडणारी आहे. आता कंपनी हिच अधिक उत्तम फिचर्ससह होंडा अमेझ फेसलिस्ट 2021 च्या रुपात लॉन्च करणार आहे. ही कार नक्कीच ग्राहकांच्या पसंदीस पडेल असा कंपनीने दावा केला आहे.(Upcoming Cars: टाटा मोटर्सची नवी टियागो एनआरजी कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये)

भारतात होंडा अमेझचे सध्या उपलब्ध असलेले मॉडेल्स आणि वेरियंटची किंमत 6.32 लाख रुपये ते 11.11 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही कार प्लॅटिनम वाइट पर्ल. गोल्डन ब्राउन मेटॅलिक, रेडिएंट रेड, लुनार सिल्वर मेटॅलिक आणि मॉर्डन स्टिल मेटॅलिक रंगात उपलब्ध आहे. आता 20201 अमेझ फेसलिस्ट बद्दल संभाव्य फिचर्स असे असू शकतात की, यामध्ये नवा टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, नवा डॅशबोर्डसह काही फिचर्स असू शकतात.