Hero MotoCorp Bikes: हीरो मोटोकॉर्पच्या मोटारसायकलची किंमत 1 जानेवारीपासून 2000 रुपयांनी वाढणार
Hero MotoCorp Bikes (PC -Facebook)

Hero MotoCorp Bikes: मोटारसायकल क्षेत्रात 'हीरो' (Hero) ही देशातील मोठी कंपनी आहे. परंतु, आता हीरो कंपनीने पुढील महिन्यांपासून आपल्या मोटारसायकलच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हीरो कंपनीच्या मोटरसायक आणि स्कूटर बाइक 1 जानेवारीपासून 2000 रुपयांनी महागणार आहेत. सोमावरी हीरो मोटोकॉर्पने यासंबंधी माहिती दिली. सध्या कोणत्या मॉडेलच्या किमती वाढणार याबद्दल कंपनीने माहिती दिली नाही. तसेच या किमतीत वाढ करण्यामागचं कारणही स्पष्ट केलेलं नाही.

हीरोची कंपनीची स्प्लेंडर सर्वात जास्त विक्री असणारी मोटारसायकल आहे. सध्या हीरो मोटोकॉर्प 39 हजार 900 रुपयांपासून उपलब्ध आहे. हीरो कंपनीने 2018-19 या वर्षात 90 लाख मोटावरसायकल बनवल्या. यातील स्प्लेंडर बाइकची सर्वात जास्त विक्री झाली. विशेष म्हणजे हीरो कंपनीने 2018-19 मध्ये 78.21 लाख मोटारसायकल विकल्या. हीरो कंपनीच्या मोटारसायकलची किमत सर्वसामान्यांना परवडणारी आहे. त्यामुळे अनेक ग्राहक हीरो मोटासायकल घेण्यास प्राधान्य देतात. (हेही वाचा - टाटा कंपनीच्या Tigor EV या इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी बुकिंग सुरु, जाणून घ्या खासियत)

हेही वाचा - मारुती सुझुकीने 'या' कारणामुळे 63 हजार कार माघारी बोलावल्या

मागील वर्षी हीरो कंपनीने प्रदूषणाच्या प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सायकल लाँच केली होती. या इलेक्ट्रिक सायकलचे नाव 'लेक्ट्रो इ झेड एफियर' (Lectro EZephyr) असे होते. यामध्ये बॅटरीसह पॅडलचाही समावेश करण्यात आला होता. या सायकलला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.